Gold Price Today: इस्रायल, इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरातील बाजारपेठांमध्ये खळबळ माजली आहे. याचा परिणाम सोन्याच्या किमतींवरही दिसून येत आहे. या आठवड्यात सोन्याचे दर स्थिर राहिले असले, तरी आठवड्याच्या निचांकी पातळीवरून सोन्याच्या भावात १७,५०० रुपयांची वाढ झाली आहे. भारतात शुक्रवारी एमसीएक्स (MCX) सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,४७,२७० रुपयांच्या पातळीवर पोहोचला होता. हा दर आठवड्याच्या १,२९,५९५ रुपये या निचांकी दरापेक्षा १७,५०० रुपयांनी अधिक आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात किमतीत घट
भारतीय बाजारात वाढ दिसत असली तरी, आंतरराष्ट्रीय बाजारात या आठवड्यात सोन्याच्या किमतीत घट झाली आहे. COMEX गोल्ड रेट ४,५०० डॉलर प्रति औंसच्या वर बंद झाला असला, तरी या आठवड्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या दरात १.८५ टक्क्यांची घसरण नोंदवण्यात आली.
१ एप्रिलपासून बदलणार ऑनलाइन पेमेंटचे नियम; आता एका पिननं काम होणार नाही, जाणून घ्या
कच्च्या तेलाच्या किमतीचा परिणाम
तज्ज्ञांच्या मते, ब्रेंट क्रूड ऑईलचा दर प्रति बॅरल १२० डॉलरवरून घसरून ९३ डॉलरच्या आसपास आला आहे. यामुळे महागाईच्या आघाडीवर थोडा दिलासा मिळाला असून, याच कारणामुळे सोनं आपल्या नीचांकी पातळीवरून १७,५०० रुपयांची रिकव्हरी करण्यात यशस्वी झालं आहे.
सोने खरेदीसाठी ही योग्य वेळ आहे का?
मार्केट एक्सपर्ट्सच्या मते, जर सोन्याचा दर ४,६०० डॉलरच्या वर राहिला तर तो ४,६८० ते ४,७५० डॉलरपर्यंत जाऊ शकतो. अशा परिस्थितीत सोन्याचा दर ४,८५० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, जर घसरणीचा कल राहिला आणि दर ४,३०० डॉलरच्या खाली आला, तर तो ४,१०० किंवा ४,१५० डॉलरच्या झोनमध्ये येऊ शकतो. सध्याच्या जागतिक परिस्थितीमुळे सोन्याच्या किमतीत वेगवान बदल पाहायला मिळू शकतात. कोणतीही मोठी घसरण विक्रीकडे, तर तेजी खरेदीकडे नेईल.
सोन्याच्या दरावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक
सोन्याच्या किमतीतील घसरणीमागे 'मॅक्रो' आणि 'क्रॉस ॲसेट' दबाव असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसंच, यूएस ट्रेझरी यील्ड (US Treasury Yield) मध्ये झालेल्या वाढीमुळे लोकांचा सोन्याकडील कल कमी झाला आहे, असंही निरीक्षण नोंदवण्यात आलंय.
