Lokmat Money >गुंतवणूक > Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर

Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर

Gold Silver Price 6 May: लग्नसराईच्या काळात एक वाईट बातमी समोर आली आहे. विशेषत: जे सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांना आता आपला खिसा आणखी रिकामा करावा लागणारे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2025 15:36 IST2025-05-06T15:34:39+5:302025-05-06T15:36:32+5:30

Gold Silver Price 6 May: लग्नसराईच्या काळात एक वाईट बातमी समोर आली आहे. विशेषत: जे सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांना आता आपला खिसा आणखी रिकामा करावा लागणारे.

Gold prices rise ahead of wedding season 6th may 2025 check latest rates of 14 to 24 carat gold before buying | Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर

Gold Price 6 May: लग्नसराईच्या हंगामापूर्वी सोन्याच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा लेटेस्ट दर

Gold Silver Price 6 May: लग्नसराईच्या काळात एक वाईट बातमी समोर आली आहे. विशेषत: जे सोन्या-चांदीचे दागिने खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांना आता आपला खिसा आणखी रिकामा करावा लागणारे. सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा वाढ झालीये. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ९६,७६१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. जीएसटी जोडल्यास त्याची किंमत ९९,६६३ रुपये होणार आहे. तर, चांदी १७४५ रुपयांनी वधारून ९५,८४५ रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. जीएसटीमुळे चांदीचा भाव ९८,७२० रुपये प्रति किलो झालाय.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत, यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केले जातात.

ट्रम्प टॅरिफमुळे विकली गेली 'ही' फूटवेअर कंपनी, ९ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकमध्ये झाली डील; नाव काय? 

सोन्यात सुमारे २१,०२१ रुपयांची वाढ 

२२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याचा भाव ९९,१०० रुपये प्रति १० ग्रॅमच्या उच्चांकी पातळीवर होता. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सोन्याचा भाव ७६,०४५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर ८५,६८० रुपये प्रति किलो होता. या दिवशी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं. चांदीही ८६,०१७ रुपये प्रति किलो ग्रॅमवर बंद झाली. ३१ जानेवारी २०२५ रोजी सोन्याचा भाव ८२,१६५ रुपये प्रति १० ग्रॅम होता. यंदा सोनं जवळपास २१,०२१ रुपयांनी तर चांदी ९८२८ रुपयांनी महागली आहे.

आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव १४१४ रुपयांनी वाढून ९६,३७४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव दुपारी सव्वाबाराच्या सुमारास १३५५ रुपयांनी वाढून ८८,६३३ रुपये झाला. १८ कॅरेट सोन्याचा भाव ११०९ रुपयांनी वाढून ७२,५७१ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव ८६५ रुपयांनी वाढून ५६,६०५ रुपये झालाय.

Web Title: Gold prices rise ahead of wedding season 6th may 2025 check latest rates of 14 to 24 carat gold before buying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.