Gold Silver Price 14 October: धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. एमसीएक्स नंतर, आज सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर नवीन उच्चांकावर पोहोचलेत. आज, सराफा बाजारात २४ कॅरेट सोनं जीएसटीसह प्रति १० ग्रॅम सुमारे १,२९,४५२ रुपये झाले आहे, तर चांदी प्रति किलो १,८१,४६० रुपयांनी विकली जात आहे. सोमवारीच चांदी एका झटक्यात १०,८२५ रुपयांनी वाढली आणि सोनं २,६३० रुपयांनी महाग झालं. ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत सोने सुमारे १०,३३३ रुपयांनी महागलं आहे आणि चांदी सुमारे ३३,५४१ रुपयांनी वाढली आहे.
आयबीजेएनुसार सोमवार, १३ ऑक्टोबर रोजी २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटी वगळून ₹१,२५,६८२ वर उघडला, जो त्याच्या मागील बंद ₹१,२३,७६९ च्या तुलनेत सुमारे ₹१,९१३ वर होता. चांदी जीएसटी वगळून ₹१,७६,१७५ प्रति किलोवर बंद झाली. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जाहीर करते: एकदा दुपारी १२ वाजताच्या सुमारास आणि दुसरे संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास दर जारी केले जातात.
कॅरेटनुसार सोन्याचे दर
- आज, २३ कॅरेट सोन्याचा दर देखील प्रति १० ग्रॅम ₹१२५,१७९ वर उघडला, जो ₹१,९०६ नं वाढला. जीएसटीसह त्याची किंमत आता ₹१,२८,९३४ आहे. यात मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.
- २२ कॅरेट सोन्याचा दर ₹१,८०७ ने वाढून प्रति १० ग्रॅम ₹११५,१७९ वर पोहोचला आहे. जीएसटीसह तो ११८६३४ रुपये झालाय.
- १८ कॅरेट सोन्याचा भाव १४३५ रुपयांनी वाढून ९४२६२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आणि जीएसटीसह त्याची किंमत ९४२६२ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचली.
- १४ कॅरेट सोन्याचा भावही १११९ रुपयांनी वाढून ७३५२५ रुपयांवर बंद झाला आणि आता जीएसटीसह ७५७२९ रुपयांवर पोहोचला आहे.