Dubai Gold Rate Today : सोनं खरेदीचा विचार करताच अनेकांच्या मनात दुबईचं नाव येतं. याचं मुख्य कारण म्हणजे दुबईमध्येसोनं भारतापेक्षा स्वस्त मिळतं. त्यामुळे तुम्हीही सोनं खरेदीचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. आज, ९ जुलै रोजी दुबईत सोन्याचे दर काय आहेत आणि भारताच्या तुलनेत ते किती स्वस्त आहे, तसेच ते भारतात आणण्याचे नियम काय आहेत, हे जाणून घेऊया.
दुबईतील सोन्याचे आजचे दर (२४ कॅरेट) | भारतात सोन्याचे आजचे दर (२४ कॅरेट) | फरक |
९२,८०५.५ रुपये | ९८,१८० रुपये | ५,५७५ |
२२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) दुबई | २२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) भारत | फरक |
८५,९७६.८० रुपये | ९०,००० रुपये | ४,०२३.२० |
१८ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) दुबई | १८ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) भारत | फरक |
७०,६५६.०५ | ७३,६४० | २,९८३.९५ |
या आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, दुबईमध्ये सोन्याचे दर भारताच्या तुलनेत लक्षणीयरित्या कमी आहेत.
दुबईतून भारतात सोनं आणण्याचे नियम: हे माहीत असणं गरजेचं!
दुबईमध्ये सोनं स्वस्त असलं तरी, तेथून सोनं खरेदी करून भारतात आणताना काही महत्त्वाचे नियम पाळावे लागतात. हे नियम जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा तुम्हाला अडचणी येऊ शकतात.
प्रवाशांसाठी मर्यादा:
महिला: दुबईतून ४० ग्रॅमपर्यंत सोनं (दागिने स्वरूपात) खरेदी करून भारतात आणू शकतात. यावर कस्टम ड्युटी लागत नाही.
पुरुष: दुबईतून २० ग्रॅमपर्यंत सोनं (दागिने स्वरूपात) खरेदी करून भारतात आणू शकतात. यावर कस्टम ड्युटी लागत नाही.
अनिवासी भारतीयांसाठी (NRI) नियम:
जर तुम्ही दुबईमध्ये राहत असाल आणि आता भारतात परत येत असाल (म्हणजे भारतात कायमस्वरूपी स्थायिक होत असाल), तर तुम्ही एक किलोपर्यंत सोनं कस्टम ड्युटीशिवाय आणू शकता.
वाचा - हिंडेनबर्गसारखं 'भूत' पुन्हा आलं! यावेळी वेदांताला धक्का, शेअर गडगडले, कारण वाचून थक्क व्हाल!
मात्र, यासाठी एक अट आहे : तुम्ही आणलेले सोनं फक्त दागिन्यांच्या स्वरूपात असावे लागते. तुम्ही ते सोने बिस्किटे किंवा नाण्यांच्या ) स्वरूपात दुबईतून आणू शकत नाही. बिस्किटे किंवा नाणी आणल्यास तुम्हाला त्यावर कस्टम ड्युटी भरावी लागेल.
सामान्यतः, जे प्रवासी १ वर्षापेक्षा जास्त काळ परदेशात राहून भारतात परत येतात, त्यांना हा १ किलो सोन्याचा लाभ मिळतो.