Lokmat Money >गुंतवणूक > सरत्या वर्षात सोने २७ टक्क्यांनी महागलं! २०२५ मध्येही भाव वाढणार का?

सरत्या वर्षात सोने २७ टक्क्यांनी महागलं! २०२५ मध्येही भाव वाढणार का?

Gold Silver Price : सोने आणि भारतीय असं समीकरण जगभर प्रसिद्ध आहे. सरत्या वर्षात सोन्याच्या किमतीत तब्बल २७ टक्के वाढ झाली. आता २०२५ मध्येही भाव वाढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 13:36 IST2024-12-31T13:33:47+5:302024-12-31T13:36:15+5:30

Gold Silver Price : सोने आणि भारतीय असं समीकरण जगभर प्रसिद्ध आहे. सरत्या वर्षात सोन्याच्या किमतीत तब्बल २७ टक्के वाढ झाली. आता २०२५ मध्येही भाव वाढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Gold prices have risen by 27 percent in the past year! Will prices increase in 2025 as well? | सरत्या वर्षात सोने २७ टक्क्यांनी महागलं! २०२५ मध्येही भाव वाढणार का?

सरत्या वर्षात सोने २७ टक्क्यांनी महागलं! २०२५ मध्येही भाव वाढणार का?

Gold Silver Price  : सरत्या वर्षात जर सर्वात जास्त कोणी भाव खाल्ला असेल तर ते सोने आहे. परतावा देण्याच्या बाबतीत सोन्याने शेअर बाजारालाही मागे टाकलं आहे. देशात वर्षाच्या शेवटट्या दिवशी सोन्याच्या किमतीत पुन्हा वाढ झाली आहे. या वर्षी आतापर्यंत सोने २७ टक्क्यांनी महागले आहे. आता पुढच्या वर्षी म्हणजे २०२५ मध्ये सोने महाग होणार की थांबणार हे पाहायचे आहे.

MCX Gold Rate Today
मल्टी कमोडिटी एक्सचेंज बद्दल बोलायचे झाले तर, ५ फेब्रुवारी २०२५ रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव ०.०२ टक्क्यांनी वाढून ७६,२७५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जर आपण चांदीबद्दल बोललो, तर एमसीएक्स वर ५ मार्च रोजी एक्सपायरी झालेल्या चांदीची किंमत ०.३६ टक्क्यांनी घसरून ८७,२२० रुपये प्रति किलो झाली आहे.    

२०२५ मध्ये सोने महाग होणार?
आशिया पॅसिफिकसाठी OANDA चे वरिष्ठ बाजार विश्लेषक केल्विन वोंग यांनी सांगितले की, भू-राजकीय तणावामुळे सोन्याच्या किमतीत यावर्षी वाढ झाली आहे आणि ती २०२५ पर्यंत कायम राहू शकते. टॅरिफ, नियंत्रणमुक्ती आणि कर बदलांसह यूएस धोरणांमधील संभाव्य बदलांसाठी बाजार सज्ज होत आहे. या सगळ्यामुळे सोन्याच्या किमतीला आकार येण्याची अपेक्षा आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदर कपात केल्यामुळे आणि वाढत्या भू-राजकीय जोखमींमुळे या वर्षी सोन्यामध्ये २७ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी सोन्याचा भाव प्रति औंस २,७९०.१५ डॉलर या सर्वोच्च पातळीवर पोहोचला होता.

देशात सोन्याला सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व आहे हे सर्वज्ञात आहे. सोने ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. विशेषत: विवाहसोहळा आणि सणांमध्ये सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. बाजारातील परिस्थिती सतत बदलत राहते आणि गुंतवणूकदार आणि व्यापारी या बदलांवर लक्ष ठेवतात. सतत बदलणारे ट्रेंड प्रभावीपणे समजून घेण्यासाठी माहिती असणे महत्त्वाचे आहे.

जागतिक बाजारात, कॉमेक्स वर सोने ०.०३ टक्क्यांनी घसरून २,६१७.२० डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत होते. या काळात चांदीचा भाव ०.३५ टक्क्यांनी घसरून २९.३१ डॉलर प्रति औंस झाला.

Web Title: Gold prices have risen by 27 percent in the past year! Will prices increase in 2025 as well?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.