Gold Silver Price 27 May: सराफा बाजारात आज पुन्हा एकदा सोनं स्वस्त झालं आहे. चांदीच्या दरात मात्र वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १४६ रुपयांची घसरण झाली आहे. चांदीच्या दरात मात्र ४४८ रुपयांची वाढ झाली. आज २४ कॅरेट सोने जीएसटीशिवाय ९५,६६७ रुपये दरानं उघडलं. तर चांदीचा भाव ९७,३५७ रुपयांवर पोहोचला. ३ टक्के जीएसटीसह सोनं ९८,५३७ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी १००२७७ रुपये प्रति किलो दरानं विकली जात आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) सोन्या-चांदीचे स्पॉट दर जाहीर केले आहेत. त्यात जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास हे दर जारी केले जातात.
काय आहेत नवे दर?
आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोनंही आज १४५ रुपयांनी स्वस्त झालं आणि ते ९५,२८४ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. काल ते ९५,४२९ वर बंद झालं. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट प्राईस दुपारी १२:१५ वाजता १३४ रुपयांनी घसरला आणि ८७,६३१ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला. काल म्हणजेच सोमवारी ते ८७,७६५ वर बंद झालं. १८ कॅरेट सोन्याची किंमतही ११० रुपयांनी स्वस्त झाली आहे आणि ती प्रति १० ग्रॅम ७१,७५० रुपयांवर आली. तर, काल ते प्रति १० ग्रॅम ७१,८६० रुपयांवर बंद झालं. १४ कॅरेट सोन्याची किंमत ८६ रुपयांनी घसरून ५५९६५ रुपयांवर आली.