Lokmat Money >गुंतवणूक > Gold Price 26 May 2025: सोन्याच्या दरात घसरण, चांदीचा भाव वाढला; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर

Gold Price 26 May 2025: सोन्याच्या दरात घसरण, चांदीचा भाव वाढला; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर

Gold Silver Price 26 May: सराफा बाजारात आज सोनं स्वस्त झालं असून चांदीच्या दरात वाढ झाली आहे. पाहा काय आहे नवे दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2025 15:05 IST2025-05-26T14:59:36+5:302025-05-26T15:05:53+5:30

Gold Silver Price 26 May: सराफा बाजारात आज सोनं स्वस्त झालं असून चांदीच्या दरात वाढ झाली आहे. पाहा काय आहे नवे दर.

Gold prices fall 26 may 2025 silver prices increase Check the new gold and silver prices before buying | Gold Price 26 May 2025: सोन्याच्या दरात घसरण, चांदीचा भाव वाढला; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर

Gold Price 26 May 2025: सोन्याच्या दरात घसरण, चांदीचा भाव वाढला; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर

Gold Silver Price 26 May: सराफा बाजारात आज सोनं स्वस्त झालं असून चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ८९ रुपयांनी स्वस्त झालाय. तर चांदीच्या दरात ८०१ रुपयांची वाढ झालीये. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीशिवाय ९५,३८२ रुपयांवर खुला झाला. तर चांदी आता ९७,७१० रुपयांवर पोहोचली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (IBJA) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकेल. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जारी केले जातात.

आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोनेही आज ८९ रुपयांनी स्वस्त झालं आणि ९५,००० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडलं. त्याच वेळी, दुपारच्या सुमारास २२ कॅरेट सोन्याची सरासरी स्पॉट किंमत ८१ रुपयांनी घसरली आणि ८७,३७० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडली. १८ कॅरेट सोन्याची किंमतही ६६ रुपयांनी स्वस्त झाली आहे आणि ती प्रति १० ग्रॅम ७१५३७ रुपयांवर आली आहे. तर, १४ कॅरेट सोन्याची किंमत ५३ रुपयांनी घसरून ५५७९८ रुपयांवर आली आहे.

अनिल अंबानींच्या ४ रुपयांच्या पेनी स्टॉकमध्ये अपर सर्किट; LIC कडेही आहे मोठा हिस्सा

जीएसटीसह किंमत किती?

आज, ३% जीएसटीसह, सोनं प्रति १० ग्रॅम ९८,२४३ रुपये आणि चांदी प्रति किलो १,००,६४१ रुपये दराने विकली जात आहे. सराफा बाजारात सोनं त्याच्या सर्वकालीन उच्चांकावरून ३७१८ रुपयांनी स्वस्त आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी सोन्याचा दर ९९,१०० रुपये प्रति १० ग्रॅम या आजवरच्या उच्चांकी स्तरावर होता. 

या वर्षी सोनं सुमारे १९,६४२ रुपयांनी आणि चांदी ११६९३ रुपयांनी महाग झाली आहे. ३१ डिसेंबर २४ रोजी सोनं ७६,०४५ रुपये प्रति १० आणि चांदी ८५,६८० रुपये प्रति किलोनं उघडली. या दिवशी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं. चांदी देखील ८६,०१७ रुपये प्रति किलोवर बंद झाली.

Web Title: Gold prices fall 26 may 2025 silver prices increase Check the new gold and silver prices before buying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.