Gold Silver Price 15 October: धनत्रयोदशी-दिवाळीपूर्वी सोन्या-चांदीचे भाव गगनाला भिडले आहेत. आज मात्र चांदीच्या दरात थोडी घसरण झाली. एमसीएक्सनंतर (MCX) आज सराफा बाजारातही सोनं नवीन सर्वकालीन उच्चांकावर पोहोचलंय. २४ कॅरेट सोन्याचा भाव आता जीएसटीसह १,३०,५९५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी जीएसटीसह १,८१,७६१ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. आता ऑक्टोबरमध्ये सोनं ११,४४३ रुपये प्रति १० ग्रॅम महाग झाले आहे. तर, चांदीच्या किंमतीत प्रति किलो ३५,६६६ रुपयांची वाढ झाली आहे.
आयबीजेएनुसार (IBJA), मंगळवारी १४ ऑक्टोबरला २४ कॅरेट सोनं जीएसटी वगळता १,२६,१५२ रुपयांवर बंद झाले होतं. दुसरीकडे, चांदी देखील जीएसटी वगळता १,७८,१०० रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. आज सोनं ६४० रुपयांनी वाढून १,२६,७९२ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडलं आणि चांदी १,६३३ रुपये प्रति किलोनं स्वस्त होऊन १,७६,४६७ रुपयांवर उघडली. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि दुसऱ्यांदा ५ वाजण्याच्या आसपास दर जारी केले जातात.
महागाई ते ट्रेड डील पर्यंत... मोदी सरकारसाठी दोन दिवसांत आल्या एका पाठोपाठ एक ४ गुड न्यूज
कॅरेटनुसार सोन्याचे भाव
- आज २३ कॅरेट सोनेही ६३७ रुपयांनी महाग होऊन १,२६,२८४ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडले. जीएसटीसह याची किंमत आता १,३०,०७२ रुपये झाली आहे. यात अद्याप मेकिंग चार्ज जोडलेला नाही.
- २२ कॅरेट सोन्याची किंमत ५८६ रुपयांनी वाढून १,१६,१४१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. जीएसटीसह ती १,१९,६२५ रुपये आहे.
- १८ कॅरेट सोनं ४८० रुपयांच्या वाढीसह ९५,०९४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलेत आणि जीएसटीसह याची किंमत ९७,९४९ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे.
- १४ कॅरेट सोनंही ३७४ रुपयांनी महाग होऊन ७४,१७३ रुपयांवर बंद झालं आणि आता जीएसटीसह ७६,३९८ रुपयांवर पोहोचले आहे.