gold silver price : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार सुरू आहेत. २२ एप्रिल रोजी १ लाख रुपयांच्या ऐतिहासिक किमतीला स्पर्श केल्यानंतर सोनं थोडं घसरलं होतं. पण आता पुन्हा एकदा सोन्याचा भाव वाढायला लागला आहे. आज, बुधवार, २१ मे २०२५ रोजी सोन्याच्या किमतीत वाढ नोंदवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चांदीचा भावही आज प्रति किलो ३००० रुपयांनी वाढला आहे. सोनं आणि चांदीला नेहमीच महागाईवर मात करणारी सुरक्षित गुंतवणूक मानली जाते, म्हणूनच अनेकजण अजूनही या मौल्यवान धातूंना प्राधान्य देतात.
आजचे सोन्याचे दर (प्रति १ ग्रॅम)
- २४ कॅरेट सोने (९९.९% शुद्ध): ९,७४२ रुपये
- २२ कॅरेट सोने (९१.६% शुद्ध): ८,९३० रुपये
- १८ कॅरेट सोने (७५% शुद्ध): ७,३०३ रुपये
तुमच्या शहरातील आजचे दर
आर्थिक राजधानी मुंबईमध्ये
मुंबईत १८ कॅरेट सोने ७,३०३ रुपये प्रति १ ग्रॅम दराने विकले जात आहे, जे काल ७,१२७ रुपये होते. २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,९३० रुपये प्रति १ ग्रॅम आहे, तर काल तो ८,७१० रुपये होता. २४ कॅरेट सोने ९,७४२ रुपयांना उपलब्ध आहे, तर काल त्याची किंमत ९,५०२ रुपये होती. म्हणजे २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा २,४०० रुपयांनी वाढला आहे.
आज दिल्लीत १८ कॅरेट सोने ७,३१९ रुपये प्रति १ ग्रॅम दराने विकले जात होते, जे काल ७,१३९ रुपयांना होते. २२ कॅरेट सोन्याचा भाव ८,९४५ रुपयांवर पोहोचला आहे, जो काल ८,७२५ रुपये होता. २४ कॅरेट सोने आज ९,७५७ रुपयांना विकले जात आहे, तर काल ते ९,५१७ रुपये प्रति १ ग्रॅम होते.
आजचे चांदीचे दर (प्रति किलो):
चांदीचा भाव: मागील दरापेक्षा ३००० रुपये प्रति किलोने वाढला आहे. आज चांदी १,००,००० रुपये प्रति किलोवर पोहोचली. काल ती ९७,००० रुपये प्रति किलो होती. लवकरच सोनेही लाखाचा टप्पा पुन्हा गाठेल असे दिसत आहे.
सोन्याची शुद्धता कशी ओळखाल?
- २४ कॅरेट सोनं (24K): हे सोनं ९९.९% शुद्ध असतं आणि सर्वात शुद्ध मानलं जातं. दागिने बनवण्यासाठी ते खूप मऊ असतं, म्हणून ते जास्त वापरलं जात नाही.
- २२ कॅरेट सोनं (22K): हे सोनं साधारणतः ९१.६% शुद्ध असतं (म्हणजे २२ भाग सोनं आणि २ भाग इतर धातू जसे तांबे किंवा चांदी). दागिने बनवण्यासाठी हे आदर्श मानलं जातं, कारण ते मजबूत असतं.
- १८ कॅरेट सोनं (18K): हे सोनं ७५% शुद्ध असतं (१८ भाग सोनं आणि ६ भाग इतर धातू). हे खूप मजबूत असतं आणि हिऱ्यांचे दागिने किंवा अधिक टिकाऊ दागिन्यांसाठी वापरलं जातं.
वाचा - 'या' शाही हॉटेल्सचा येतोय IPO, ग्रे मार्केटमध्येही घालतोय धुमाकूळ; गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी!
शुद्धता तपासण्याच्या काही सोप्या पद्धती:
- हॉलमार्क (Hallmark): सोन्याच्या दागिन्यांवर 'हॉलमार्क' चिन्ह आहे की नाही ते तपासा. हॉलमार्क हे भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे सोन्याच्या शुद्धतेची हमी देणारे चिन्ह आहे. यावर सोन्याची कॅरेट आणि BIS चे लोगो असतो. हे सर्वात विश्वासार्ह चिन्ह आहे.
- मॅग्नेट टेस्ट (Magnet Test): सोनं चुंबकाला आकर्षित होत नाही. एक मजबूत चुंबक सोन्याच्या दागिन्याजवळ धरून पहा. जर दागिना चुंबकाला चिकटला, तर तो शुद्ध सोनं असण्याची शक्यता कमी असते.
- फ्लोटिंग टेस्ट (Floating Test): एक ग्लास पाण्यात सोनं टाका. शुद्ध सोनं जड असल्यामुळे ते लगेच तळाशी जाईल. जर ते तरंगले किंवा वर राहिले, तर ते शुद्ध नसण्याची शक्यता असते.
- ॲसिड टेस्ट (Acid Test): ही टेस्ट ज्वेलर्स किंवा तज्ञांकडूनच करून घ्यावी. यामध्ये नायट्रिक ॲसिड वापरून सोन्याची शुद्धता तपासली जाते.