Gold Price Today: लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोन्याच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ दिसून येत आहे. सोन्याच्या किमतीत कालच्या तुलनेत आज ₹२,००० हून अधिकची वाढ झाली आहे. मंगळवारी चांदीचा दरही सोमवारच्या तुलनेत सुमारे ₹३,५०० नं वाढला आहे. सराफा बाजारात आज मंगळवारच्या सकाळी २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१,२४,१४७ प्रति १० ग्रॅमवर पोहोचलाय.
यापूर्वी सोमवारच्या सकाळी सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१,२२,०८७ प्रति १० ग्रॅम होता. म्हणजेच, कालच्या तुलनेत आज सोन्याचा दर ₹२,०६० प्रति १० ग्रॅमनं वाढला आहे. माहितीनुसार, चांदी काल सोमवारी ₹१,५०,९७५ प्रति किलो विकली जात होती. आज सराफा बाजारात चांदीचा दर ₹१,५४,३३८ प्रति किलोवर पोहोचला आहे. चांदीच्या किमतीत गेल्या २४ तासांत ₹३,३६३ ची वाढ झाली आहे.
“मी आता शांत होत चाललोय,” ६ दशकांची परंपरा थांबणार; वॅारन बफेंनी सोडलं ‘हे’ काम
२३ कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
Ibjarates च्या आकडेवारीनुसार, २३ कॅरेट सोन्याचा दर आज ₹१,२३,६५० प्रति १० ग्रॅम आहे. तर, २२ कॅरेट सोनं ₹१,१३,७१९ प्रति १० ग्रॅमवर आणि १८ कॅरेट सोनंही ₹१,१३,७१९ प्रति १० ग्रॅमवर विकलं जात आहे.
लग्नसराईचा हंगाम सुरू
दसरा आणि धनत्रयोदशीनंतर बाजारात सोन्याच्या दागिन्यांच्या मागणीत घट झाली होती. त्याचा परिणाम सोन्याच्या किमतींवरही दिसून आला होता. दिवाळीनंतर सोनं स्वस्त होत गेले. पण, पुन्हा एकदा सोन्याने वेग पकडला आहे. सोन्याच्या किमतीत वाढ होण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक म्हणजे भारतात लग्नसराईचा हंगाम सुरू होणे हे आहे. आता या हंगामात सोन्याची मागणी अधिक राहील.
