Gold Price Today: सोन्याची झळाळी अखेर थोडीशी कमी झाली आहे. सोमवारी भारतात सोन्याच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली. भावाने विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर सोने खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे. सोने आणि शेअर बाजाराचा छत्तीसचा आकडा समजला जातो. कारण, जेव्हा मार्केट वर जातं, तेव्हा सोन्याचे भाव खाली येतात. याउलट बाजार पडला तर सोन्याचा भाव वधारतो. सध्या शेअर बाजार सातत्याने घसरत असल्याने सोन्याला सुगीचे दिवस आले आहेत. सामान्य माणूसच नाही तर भारत सरकारही सोन्याचा साठा वाढवत आहे.
गुड रिटर्न्सनुसार, १७ मार्च रोजी देशात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ११० रुपयांनी घसरून ८९,५६० रुपयांवर आली. दरम्यान, २२ कॅरेट सोन्याचा भाव आज प्रति १० ग्रॅम १०० रुपयांनी घसरून ८२,१०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. याशिवाय १८ कॅरेट सोन्याचा भाव ८० रुपयांनी घसरून ६७,१८० रुपये प्रति १० ग्रॅम झाला.
मुंबई, चेन्नई, बेंगळुरू आणि हैदराबादमध्ये आज सोने
मुंबईमध्ये २४ कॅरेट सोन्याची प्रति १० ग्रॅम किंमत ८९,५६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर २२ कॅरेटसाठी तुम्हाला ८२,१०० रुपये मोजावे लागतील. चेन्नईमध्ये २४ कॅरेट सोन्याची प्रति १० ग्रॅम किंमत ८९,५६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे, तर चेन्नईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ८२,१०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. बंगळुरूमध्ये २४ कॅरेट सोन्याची किंमत आता ८९,५६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे, तर २२ कॅरेट सोन्याची किंमत आता ८२,१०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. त्याचप्रमाणे हैदराबादमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत ८२,१०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत ८७,५६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
चांदीची किंमत
बातमीनुसार, भारतात चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सध्या १ किलो चांदीचा भाव १०० रुपयांनी घसरून १०२,९०० रुपयांवर आला आहे, तर १०० ग्रॅम चांदीचा भाव १० रुपयांनी घसरून १०,२९० रुपयांवर आला आहे.
MCX वर आजची किंमत
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसून आली. सध्या, ४ एप्रिल २०२५ रोजी परिपक्व होणारे सोन्याचे फ्युचर्स ०.२५% कमी होऊन ८७,७७४ रुपयांवर व्यवहार करत आहेत. ५ मे २०२५ रोजी एक्सपायरी डेट असलेल्या चांदीच्या फ्युचर्समध्ये आज सकाळी घसरण झाली. त्यात ०.२८% ची घसरण दिसून आली जी १,००,४५४ वर व्यापार करत आहे.