Lokmat Money >गुंतवणूक > Trump Tarrif मुळे सोनं नव्या शिखरावर, चांदी एका झटक्यात २२३६ रुपयांनी स्वस्त; पाहा नवे दर

Trump Tarrif मुळे सोनं नव्या शिखरावर, चांदी एका झटक्यात २२३६ रुपयांनी स्वस्त; पाहा नवे दर

Trump Tariff Impact on Gold Silver Price 3 April: आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीची चमक मात्र कमी झालीये.

By जयदीप दाभोळकर | Updated: April 3, 2025 14:39 IST2025-04-03T14:35:07+5:302025-04-03T14:39:43+5:30

Trump Tariff Impact on Gold Silver Price 3 April: आज सराफा बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीची चमक मात्र कमी झालीये.

Gold hits new high due to Trump Tariff silver drops by Rs 2236 in one go See new rates | Trump Tarrif मुळे सोनं नव्या शिखरावर, चांदी एका झटक्यात २२३६ रुपयांनी स्वस्त; पाहा नवे दर

Trump Tarrif मुळे सोनं नव्या शिखरावर, चांदी एका झटक्यात २२३६ रुपयांनी स्वस्त; पाहा नवे दर

Gold Silver Price 3 April: आज सराफा बाजारात जीएसटीशिवायचं २४ कॅरेट सोनं २०९ रुपयांनी महागलं आहे. सोनं आज ९१,२०५ रुपये प्रति ग्रॅमच्या नव्या उच्चांकी पातळीवर उघडलं. तर चांदीत मात्र २२३६ रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. आज चांदी ९७,३०० रुपये प्रति किलोग्रॅमवर उघडली. या दरामध्ये जीएसटीचा समावेश नाही. ३ टक्के जीएसटी जोडल्यास आज सोन्याचा भाव ९३,९४१ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर १००२१९ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) सराफा बाजाराचे हे दर जाहीर केले आहेत. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा असू शकतो. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जारी केले जातात.

मुलींसाठी सिद्धीविनायक न्यासाचा पुढाकार; राबवणार ‘श्रीसिद्धिविनायक भाग्यलक्ष्मी योजना’, काय आहे ही योजना? 

१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर काय?

आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव २०८ रुपयांनी वाढून ९०,८४० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव दुपारी १ वाजण्याच्या सुमारास १९२ रुपयांनी वाढून ८३,५४४ रुपये झाला. १० कॅरेट सोन्याचा भाव ६६,९६० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव १२२ रुपयांनी वाढून ५३३५५ रुपये झाला आहे. या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या दरात १५,४६५ रुपये आणि चांदीच्या दरात ११,२८३ रुपयांची वाढ झाली आहे.

Web Title: Gold hits new high due to Trump Tariff silver drops by Rs 2236 in one go See new rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.