Gold prices today: सोन्याच्या दरात शुक्रवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. एमसीएक्सवर (MCX) सोन्याचा भाव २% नी खाली आला. एमसीएक्स गोल्ड डिसेंबर फ्युचरचा भाव २.६४ टक्के किंवा ₹३,३५१ च्या घसरणीनंतर ₹१,२३,४०० च्या पातळीवर आला. त्याचबरोबर, एमसीएक्स सिल्वर डिसेंबर कॉन्ट्रॅक्ट्सचा दर ४.२७ टक्क्यांच्या घसरणीनंतर ₹१,५५,५३० च्या पातळीवर आला.
६,००० रुपयांनी घसरला भाव
सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर काल ₹१,२४,७९४ प्रति १० ग्रॅम च्या पातळीवर आला होता. त्याच वेळी, २३ कॅरेट सोन्याचा दर ₹१,२४,२९४ आणि २२ कॅरेट सोन्याचा दर ₹१,१४,३११ च्या पातळीवर होता. चांदीचा दर ₹१,५९,३६७ च्या पातळीवर आला होता. माहितीनुसार, १७ ऑक्टोबर रोजी सोन्याचा दर ₹१,३०,८७४ च्या विक्रमी उच्चांकावर होता. तेव्हापासून आतापर्यंत २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ₹६,००० रुपयांची घसरण झाली आहे.
२० वर्षांत सोन्यात १२००% वाढ
२००५ मध्ये सोन्याचा भाव ₹७,६३८ प्रति १० ग्रॅम च्या पातळीवर होता. सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या आकडेवारीनुसार, सोन्याचा दर ₹१,२५,००० च्या पातळीवर होता. तेव्हापासून आतापर्यंत सोन्याच्या किमतीत १२०० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. या वर्षात आतापर्यंत सोन्याच्या किमतीत ५६ टक्के वाढ झाली आहे.
खरेदीदारांना मोठा दिलासा
सोन्याच्या किमतीत झालेल्या घसरणीनंतर खरेदीदारांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. भारतात लग्नसराईचा हंगाम पुन्हा सुरू झालाय. अशात सोन्याच्या किमती खाली आल्यानं खरेदीदारांसाठी ही खूप दिलासादायक बातमी आहे. दसरा आणि दिवाळीनंतर भारतीय बाजारात फिजिकल सोन्याच्या खरेदीत घट पाहायला मिळाली होती.
भारत करत आहे सोन्याची जोरदार खरेदी
जगभरातील मध्यवर्ती बँका सध्या मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी करत आहेत. भारत देखील त्या देशांपैकी एक आहे, ज्याने अलीकडच्या वर्षांत खूप सोनं खरेदी केलं आहे.
