Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > इस्राईलमध्ये सोने-चांदी स्वस्त? भारतीय रुपयाच्या तुलनेत पाहा काय आहेत तिथले दर; कशाला आहे जास्त मागणी?

इस्राईलमध्ये सोने-चांदी स्वस्त? भारतीय रुपयाच्या तुलनेत पाहा काय आहेत तिथले दर; कशाला आहे जास्त मागणी?

Gold Silver rate in Israel : इस्रायलमध्ये सोने आणि चांदीचे दर जागतिक बाजारपेठेनुसार ठरवले जातात, जिथे लोक गुंतवणूक आणि दागिने दोन्हीसाठी ते खरेदी करतात.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 12:38 IST2026-02-26T11:30:31+5:302026-02-26T12:38:22+5:30

Gold Silver rate in Israel : इस्रायलमध्ये सोने आणि चांदीचे दर जागतिक बाजारपेठेनुसार ठरवले जातात, जिथे लोक गुंतवणूक आणि दागिने दोन्हीसाठी ते खरेदी करतात.

Gold and Silver Rates in Israel 2026 A Comparative Analysis with Indian Prices | इस्राईलमध्ये सोने-चांदी स्वस्त? भारतीय रुपयाच्या तुलनेत पाहा काय आहेत तिथले दर; कशाला आहे जास्त मागणी?

इस्राईलमध्ये सोने-चांदी स्वस्त? भारतीय रुपयाच्या तुलनेत पाहा काय आहेत तिथले दर; कशाला आहे जास्त मागणी?

Gold Silver rate in Israel : जागतिक भूराजकीय घडामोडींचे केंद्र असलेल्या इस्राईलमध्ये केवळ युद्धाचीच चर्चा नसते, तर तिथली गुंतवणूक बाजारपेठही तितकीच सक्रिय आहे. इस्राईलमधील नागरिक सोन्या-चांदीकडे केवळ दागिने म्हणून नव्हे, तर 'सेफ हेवन' म्हणजेच सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहतात. विशेष म्हणजे, सध्याच्या दरानुसार इस्राईलमध्ये भारतीय बाजारपेठेपेक्षा सोने आणि चांदी काहीशी स्वस्त दरात उपलब्ध आहे.

इस्राईलमधील चांदीचे दर: भारतीय रुपयातील मूल्य
इस्राईलचे अधिकृत चलन 'शेकेल' हे भारतीय रुपयाच्या तुलनेत अधिक मजबूत आहे. सध्याच्या विनिमय दरानुसार १ शेकेल म्हणजे सुमारे २९.४१ भारतीय रुपये आहे. तिथे एक किलो चांदीचा दर ८,८९२ शेकेल इतका आहे. भारतीय चलनात हे मूल्य २,६१,४७५ रुपये होते. भारतामध्ये सध्या एक किलो चांदीचा दर सुमारे २.६५ लाख रुपयांच्या आसपास आहे. म्हणजेच इस्राईलमध्ये चांदी प्रति किलो साधारण ४-५ हजार रुपयांनी स्वस्त आहे.

सोन्याच्या किमतीतही मोठी तफावत
सोन्याच्या बाबतीतही इस्राईलमधील दर भारताच्या तुलनेत कमी असल्याचे दिसून येते. इस्राईलमध्ये १० ग्रॅम सोन्याची किंमत ५,१६० शेकेल आहे, ज्याचे भारतीय मूल्य १,५१,७३३ रुपये भरते. भारतात सध्या २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा दर १.५९ लाख रुपयांच्या पार गेला आहे. इस्राईलमध्ये १० ग्रॅम सोन्यावर भारतीयांची सुमारे ७-८ हजार रुपयांची बचत होऊ शकते.

वाचा - बँक घोटाळा भोवला! अनिल अंबानींचे मुंबईतील निवासस्थान जप्त; अलिशान घराची किंमत वाचून अवाक व्हाल

गुंतवणुकीचा कल आणि रिअल-टाइम बदल
तेल अवीव आणि येरुशलेम यांसारख्या शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या मोठ्या बाजारपेठा आहेत. जागतिक मागणी, डॉलर-शेकेलचा विनिमय दर आणि महागाई यावर आधारित हे दर रिअल-टाइममध्ये बदलत असतात. जेव्हा जेव्हा जागतिक स्तरावर आर्थिक किंवा राजकीय अस्थिरता निर्माण होते, तेव्हा इस्राईली गुंतवणूकदार आपला पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी सोन्यात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात," असे जागतिक बाजार तज्ज्ञांचे मत आहे.
 

Web Title : क्या इस्राईल में सोना-चांदी सस्ता है? भारतीय रुपये से तुलना

Web Summary : भारत की तुलना में इस्राईल में सोना और चांदी अपेक्षाकृत सस्ते हैं। चांदी लगभग ₹4-5 हजार प्रति किलो कम है, और 10 ग्राम सोना खरीदने पर लगभग ₹7-8 हजार बचाए जा सकते हैं। इस्राईली वैश्विक अनिश्चितताओं के बीच सोने को एक सुरक्षित निवेश मानते हैं।

Web Title : Gold, Silver Cheaper in Israel? Comparing Rates to Indian Rupee

Web Summary : Gold and silver are relatively cheaper in Israel than India. Silver costs approximately ₹4-5 thousand less per kg, and 10 grams of gold could save around ₹7-8 thousand. Israelis see gold as a safe investment amidst global uncertainties.