Gold Silver Rate Today 12 Jan 2026: आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावात मोठी दरवाढ झाली आहे. या दोन्ही मौल्यवान धातूंनी नव्या उच्चांकी पातळीला स्पर्श केला आहे. चांदीच्या किमतीत एका झटक्यात १४,४७५ रुपयांची वाढ झाली, तर सोने २,८८३ रुपयांनी महागलं आहे. जीएसटीशिवाय चांदीचा भाव २,५७,२८३ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. जीएसटीसह चांदी आता २,६५,००१ रुपये प्रति किलोवर आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह १,४४,२०५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. जीएसटीशिवाय सोन्याचा भाव आज १,४०,००५ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला.
जुने रेकॉर्ड मोडीत
शुक्रवारी जीएसटीशिवाय चांदी २४२,८०८ रुपयांवर बंद झाली होती. त्याचप्रमाणे, जीएसटीशिवाय सोने १३७,१२२ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाले होते. जीएसटीशिवाय सोन्यानं २९ डिसेंबर २०२५ रोजीचा १३८,१८१ रुपयांचा 'ऑल टाइम हाय' रेकॉर्ड मोडला आहे. तसेच, जीएसटीशिवाय चांदीनेही ७ जानेवारीचा २४८,००० रुपयांचा उच्चांक बराच मागे टाकला. हे दर आयबीजेए (IBJA) द्वारे जाहीर करण्यात आले आहेत. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जाहीर करते.
BSNL चा धमाका: वर्षभरासाठी रिचार्जची कटकट संपली! 'या' प्लॅनमध्ये दररोज मिळतोय ३GB डेटा आणि बरंच काही
कॅरेटनुसार सोन्याचे भाव
२३ कॅरेट गोल्ड: २,८७१ रुपयांच्या वाढीसह १३९,४४४ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. जीएसटीसह याची किंमत आता १४३,६२७ रुपये झाली आहे. यात मेकिंग चार्जचा समावेश नाही.
२२ कॅरेट गोल्ड: २,६४१ रुपयांनी महाग होऊन १२८,२४५ रुपये प्रति १० ग्रॅमवर आलं आहे. जीएसटीसह याची किंमत १३२,०९२ रुपये आहे.
१८ कॅरेट गोल्ड: २,१६२ रुपयांची तेजी दिसून आली असून आज १०५,००४ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. जीएसटीसह सोन्याची किंमत १०८,१५४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली.
१४ कॅरेट गोल्ड: या दरात १६८७ रुपयांची तेजी दिसून आली आहे. आज हे सोनं ८१,९०३ रुपयांवर उघडले आणि जीएसटीसह ८४,३६० रुपयांवर पोहोचलं.
