Gold Silver Price 7 Nov: लग्नसराईचा हंगाम सुरू होताच सोने आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण दिसून येत आहे. आज, म्हणजेच शुक्रवार ७ नोव्हेंबरला, २४ कॅरेट सोन्याचा भाव ४३९ रुपयांनी स्वस्त होऊन १,२०,२३१ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला. आता जीएसटीसह सोन्याचा भाव १,२३,८३७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर, चांदीचा भाव जीएसटीसह १,५२,४५० रुपये प्रति किलो आहे. आज चांदी जीएसटीशिवाय २३२ रुपयांनी घसरून १,४८,०१० रुपये प्रति किलो दरानं उघडली.
सोन्याचा भाव आता १७ ऑक्टोबरच्या विक्रमी उच्चांकावरून १०,६४३ रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर, चांदीचा भाव १४ ऑक्टोबरच्या विक्रमी उच्चांकावरून ३०,०९० रुपयांनी खाली आला आहे. आयबीजेए (IBJA) दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ वाजताच्या सुमारास आणि दुसरे एकदा संध्याकाळी ५ वाजताच्या आसपास दर जारी केले जातात.
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
कॅरेटनुसार सोन्याचे दर
२३ कॅरेट सोनं: आज ४३७ रुपयांनी स्वस्त होऊन १,१९,७५० रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उघडलं. जीएसटीसह याची किंमत आता १,२३,३४२ रुपये झाली आहे. (यात मेकिंग चार्ज जोडलेला नाही.)
२२ कॅरेट सोनं: ४०२ रुपयांनी घसरून १,१०,१३२ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं आहे. जीएसटीसह हा दर १,१३,४३५ रुपये आहे.
१८ कॅरेट सोनं: ३३० रुपयांच्या घसरणीसह ९०,१७३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं आणि जीएसटीसह याची किंमत ९२,८७८ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे.
१४ कॅरेट सोनं: २५७ रुपयांच्या घसरणीसह ७०,३३५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं आणि जीएसटीसह याची किंमत ७२,४४५ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे.
या वर्षात सोन्याचा भाव ४४,४९१ रुपये प्रति १० ग्रॅमनं महागला आहे. तर, चांदी ६१,९९३ रुपये प्रति किलोने वाढली आहे.
