Lokmat Money >गुंतवणूक > ऑल टाईम हायवरुन घसरले सोन्या-चांदीचे दर; पाहा काय आहे लेटेस्ट किंमत  

ऑल टाईम हायवरुन घसरले सोन्या-चांदीचे दर; पाहा काय आहे लेटेस्ट किंमत  

Gold Silver Price Today 20 Feb: सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. पाहा काय आहे आजचे लेटेस्ट दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 14:12 IST2025-02-20T14:09:04+5:302025-02-20T14:12:05+5:30

Gold Silver Price Today 20 Feb: सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. पाहा काय आहे आजचे लेटेस्ट दर.

Gold and silver prices fall from all time high see what is the latest price know details | ऑल टाईम हायवरुन घसरले सोन्या-चांदीचे दर; पाहा काय आहे लेटेस्ट किंमत  

ऑल टाईम हायवरुन घसरले सोन्या-चांदीचे दर; पाहा काय आहे लेटेस्ट किंमत  

Gold Silver Price Today 20 Feb: सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव बुधवारच्या उच्चांकी ८६७३३ रुपयांवरून घसरून ८६५४१ रुपयांवर आलाय. चांदीच्या दरातही घसरण झाली आहे. आज २० फेब्रुवारी रोजी २४ कॅरेट सोन्याच्या दरात १९२ रुपयांची घसरण झाली. चांदीचा भाव मात्र ३८५ रुपयांनी घसरून ९७,१८१ रुपये प्रति किलो ग्रॅम झालाय. 

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) हा दर जाहीर केलाय. यामध्ये जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो.

आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव १९२ रुपयांनी कमी होऊन ८६,१९४ रुपये झालाय. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भावही १७५ रुपयांनी कमी होऊन ७९,२७२ रुपये झालाय. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव १४४ रुपयांनी घसरून ६६,९६० रुपये झाला आणि १४ कॅरेट सोन्याचा भाव आता ११२ रुपयांनी कमी होऊन ५०,६२७ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय.

सोनं १०,८०१ रुपयांनी, चांदी ११,१६४ रुपयांनी महागलं

३१ डिसेंबर २०२० रोजी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं होतं. चांदीही ८६,०१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली. या वर्षी आतापर्यंत सोनं १०,८०१ रुपयांनी तर चांदी ११,१६४ रुपयांनी महागली आहे. फेब्रुवारीबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत सोन्यात ४४५५ रुपयांची वाढ झाली आहे. कारण, ३१ जानेवारी २०२५ रोजी सोन्याचा दर ८२,१६५ रुपये प्रति १० ग्रॅम होता.

Web Title: Gold and silver prices fall from all time high see what is the latest price know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.