Gold-silver rate today : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा टॅरिफचं हत्यार उगारलं आहे. आतापर्यंत २१ देशांवर ट्रम्प यांनी आयात शुल्क लादलं आहे. तर ब्राझीलमधून येणाऱ्या सर्व तांब्याच्या आयातीवर ५०% शुल्क लादले आहे. या निर्णयाचा थेट परिणाम जागतिक बाजारपेठेवर झाला. याचा परिणाम अमेरिकन डॉलरवरही दिसला, जो सुरुवातीला कमकुवत झाला आणि त्यानंतर सोन्याच्या किमतींमध्येही बदल नोंदवले गेले.
सोने-चांदी 'सुरक्षित आश्रयस्थान' का?
जेव्हा बाजारात अनिश्चितता असते किंवा जगात अशांतता असते, तेव्हा गुंतवणूकदार सोने आणि चांदीसारख्या 'सुरक्षित आश्रयस्थान'कडे वळतात. गेल्या २० वर्षांत सोन्याने सुमारे १२००% परतावा दिला आहे. २००५ मध्ये त्याची किंमत ७,६३८ रुपये प्रति १० ग्रॅम होती, जी आता १ लाख रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. यात चांदीही मागे नाही. गेल्या दोन दशकांत तिने सुमारे ६६९% परतावा दिला आहे. याचा अर्थ, ज्यांनी या मौल्यवान धातूंमध्ये दीर्घकाळ पैसे गुंतवले, ते नेहमीच फायद्यात राहिले.
आज सोने आणि चांदीचा भाव किती?
आज, १० जुलै रोजी, सोने आणि चांदीच्या भावात घसरण दिसून आली आहे. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास, मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने प्रति १० ग्रॅम सुमारे ९६,५४७ रुपये आणि चांदी प्रति किलो सुमारे १,०७,६०९ रुपये होती. इंडियन बुलियन असोसिएशन (IBAJ) नुसार, २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९६,८३८ रुपये आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ८८,७०३ रुपये होती. याचा २४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ७०० रुपयांनी घट झाली आहे. तर उत्तम दर्जाच्या चांदीची (९९९ शुद्धता) किंमत प्रति किलो १,०७,७०० रुपये नोंदवण्यात आली.
शहर | गोल्ड बुलियन (१० ग्रॅम) | MCX गोल्ड (१० ग्रॅम) | सिल्वर बुलियन (किलो) | MCX सिल्वर ९९९ (किलो) |
मुंबई | ₹९६,८१० | ₹९६,५४७ | ₹१,०७,४६० | ₹१,०७,६०९ |
दिल्ली | ₹९६,६४० | ₹९६,५४७ | ₹१,०७,२८० | ₹१,०७,६०९ |
कोलकाता | ₹९६,६८० | ₹९६,५४७ | ₹१,०७,३२० | ₹१,०७,६०९ |
हैदराबाद | ₹९६,९६३ | ₹९६,५४७ | ₹१,०७,६४० | | ₹१,०७,६०९ |
चेन्नई | ₹९७,१०० | ₹९६,५४७ | ₹१,०७,८४० | | ₹१,०७,६०९ |
वाचा - सेबीने जेन स्ट्रीट प्रकरण जाणूनबुजून लांबवले? माधवी बुच यांचा 'स्फोटक' खुलासा, आता सत्य काय?
दिल्ली, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू आणि चेन्नईसारख्या प्रमुख शहरांमध्ये सोन्या-चांदीच्या किमती वेगवेगळ्या आहेत. सामान्य ग्राहकांसाठी, या दरांमध्ये मेकिंग चार्जेस, कर (टॅक्स) आणि जीएसटी (GST) देखील जोडले जातात, ज्यामुळे सोन्या-चांदीची अंतिम किंमत आणखी वाढू शकते.