Lokmat Money >गुंतवणूक > GST परिषदेच्या निर्णयानंतर सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण! तुमच्या शहरतील आजचे ताजे भाव काय?

GST परिषदेच्या निर्णयानंतर सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण! तुमच्या शहरतील आजचे ताजे भाव काय?

Gold-Silver Price Today: जर तुम्ही लग्न, गुंतवणूक किंवा सणांसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सोने आणि चांदीच्या नवीनतम किमती जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 12:32 IST2025-09-04T12:30:54+5:302025-09-04T12:32:08+5:30

Gold-Silver Price Today: जर तुम्ही लग्न, गुंतवणूक किंवा सणांसाठी सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर सोने आणि चांदीच्या नवीनतम किमती जाणून घेणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.

Gold and Silver Prices Drop After GST Council Meeting | GST परिषदेच्या निर्णयानंतर सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण! तुमच्या शहरतील आजचे ताजे भाव काय?

GST परिषदेच्या निर्णयानंतर सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण! तुमच्या शहरतील आजचे ताजे भाव काय?

Gold Silver Price : देशभरातील सोने खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जीएसटी परिषदेच्या ५६ व्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले, ज्याचा थेट परिणाम बाजारावर दिसून येत आहे. या बैठकीनंतर देशभरात सोन्याच्या किंमतीत घसरण नोंदवली गेली आहे, तर एमसीएक्सवर (MCX) चांदीच्या दरातही घट झाली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जीएसटी स्लॅब चार वरून दोन (५% आणि १८%) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, सोन्या आणि चांदीवर पूर्वीचेच दर लागू असतील, म्हणजेच सोन्यावर ३% जीएसटी आणि घडणावळ शुल्कावर ५% जीएसटी घेतला जाईल. त्यामुळे, जर तुम्हीही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आजचे तुमच्या शहरातील ताजे दर जाणून घ्या.

४ सप्टेंबर २०२५ रोजी प्रमुख शहरांमधील सोन्याचे दर:

शहराचे नाव २२ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) २४ कॅरेट सोने (प्रति १० ग्रॅम) 
दिल्ली९८,१०० रुपये १,०७,१२० रुपये 
मुंबई९८,०५० रुपये १,०६,९७० रुपये 
पुणे९८,०५० रुपये १,०६,८६० रुपये 
बंगळूरु९७,९५० रुपये १,०६,८६० रुपये 
चेन्नई९७,९५० रुपये१,०६,८६० रुपये 

सोन्याप्रमाणे चांदीही स्वस्त झाली
सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातही १ टक्क्यांपेक्षा जास्त घसरण दिसून आली आहे. एमसीएक्सवर चांदी आज १,२४,०८० रुपये प्रति किलो दराने व्यवहार करत आहे, तर काल एमसीएक्सवर चांदी १,२५,८७२ रुपये प्रति किलो वर बंद झाली होती.

वाचा - घर खरेदीदारांसाठी मोठी भेट! 'या' वस्तूवरील जीएसटीमध्ये मोठी कपात; घर बांधणेही होणार स्वस्त

गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे काय आहे?
तज्ज्ञांचे मत आहे की, जीएसटी परिषदेच्या या सुधारणांमुळे देशातील उपभोग वाढेल आणि त्याचा फायदा सोने-चांदीच्या मागणीवरही होईल. काही दिवसांपूर्वी सोन्याच्या किंमतींनी विक्रमी उंची गाठली होती आणि याचे सर्वात मोठे कारण अमेरिकेतील व्याजदर कमी होण्याची शक्यता हे आहे. जेव्हा व्याजदर कमी होण्याची शक्यता असते, तेव्हा लोक सोन्यासारख्या सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय निवडतात. म्हणूनच, कठीण आणि अनिश्चित काळात सोने हा नेहमीच सर्वात विश्वासार्ह गुंतवणूक पर्याय मानला गेला आहे.

 

Web Title: Gold and Silver Prices Drop After GST Council Meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.