Lokmat Money >गुंतवणूक > सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?

Gold and Silver Price : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात युक्रेन युद्धाबाबत झालेल्या शांतता चर्चेमुळे सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 14:15 IST2025-08-20T14:13:26+5:302025-08-20T14:15:14+5:30

Gold and Silver Price : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात युक्रेन युद्धाबाबत झालेल्या शांतता चर्चेमुळे सोन्याच्या किमतीत घसरण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Gold and Silver Price in India Why Prices Dropped Despite International Rise | सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?

सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?

Gold and Silver Price : आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असूनही, मंगळवारी देशात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी घसरण दिसून आली. ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत सोन्याच्या दरात ५०० रुपयांची, तर चांदीच्या दरात तब्बल १,००० रुपयांची घट नोंदवण्यात आली आहे. तर दुसरीकडे मुंबई-पुण्यातही सोन्याच्या किमती ६०० रुपयांनी कमी झाल्या आहेत.

सोने-चांदीचे नवे दर
पीटीआयच्या वृत्तानुसार, दिल्लीत ९९.९ टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव ५०० रुपयांनी घसरून १,००,४२० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. मागील व्यवहाराच्या दिवशी सोन्याचा भाव १,००,९२० रुपये प्रति १० ग्रॅम होता. त्याचप्रमाणे, ९९.५ टक्के शुद्ध सोन्याचा दर ४५० रुपयांनी कमी होऊन १,००,०५० रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला. तर मुंबईतही सोन्याचा दर ६०० रुपयांनी स्वस्त झाल्याने प्रति तोळा सोने १,००,१५० रुपयांना झाले आहे

चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली. चांदीचा भाव १,००० रुपयांनी कमी होऊन १,१४,००० रुपये प्रति किलो झाला, तर सोमवारच्या व्यवहारात तो १,१५,००० रुपये प्रति किलो होता.

घसरणीमागील कारणे
तज्ञांच्या मते, युक्रेन युद्धाबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्यात झालेल्या शांतता चर्चेमुळे सोन्याच्या दरात नरमाई दिसून आली. तसेच, भारतीय सरकारने जीएसटी नियमांमध्ये केलेल्या बदलांमुळे USD/INR (रुपया) कमकुवत झाला, ज्यामुळे देशांतर्गत सोन्याच्या किमतींवर दबाव आला.

वाचा - Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती
आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र सोन्यामध्ये वाढ दिसून आली. न्यूयॉर्कमध्ये स्पॉट गोल्डचा भाव ०.१५ टक्क्यांनी वाढून ३,३३७.९२ डॉलर प्रति औंस वर व्यवहार करत होता. चांदीचा भावही ०.१९ टक्क्यांनी वाढून ३८.०९ डॉलर प्रति औंस झाला. गुंतवणूकदारांचे लक्ष आता अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षांचे, जेरोम पॉवेल यांचे जॅक्सन होलमध्ये होणाऱ्या भाषणाकडे लागले आहे, त्यामुळे सोन्याचे भाव ३,३८० डॉलर प्रति औंसच्या खाली आले आहेत.

Web Title: Gold and Silver Price in India Why Prices Dropped Despite International Rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.