Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा

सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा

Gold Silver News : सरकारने सोने आणि चांदीच्या आयात-आधारभूत किमतींमध्ये कपात केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सराफा बाजारात पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 16:21 IST2026-04-06T16:10:18+5:302026-04-06T16:21:20+5:30

Gold Silver News : सरकारने सोने आणि चांदीच्या आयात-आधारभूत किमतींमध्ये कपात केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सराफा बाजारात पुन्हा एकदा नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Gold and Silver Base Import Price Cut: Why Domestic Prices Might Drop Soon? | सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा

सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा

Gold Silver News : लग्नसराई आणि सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी केंद्र सरकारने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. सरकारने सोने आणि चांदीच्या 'बेस इम्पोर्ट प्राईस'मध्ये लक्षणीय कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सराफा बाजारात खळबळ उडाली असून, येत्या काळात देशांतर्गत बाजारपेठेत सोन्या-चांदीचे दर स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय आहे नेमका बदल?
सरकारने ज्या किमतीवर आयात शुल्क मोजले जाते, त्या पायाभूत किमतीत मोठी घट केली आहे.

धातू जुनी बेस प्राईस (प्रति युनिट) नवीन बेस प्राईस (प्रति युनिट) अंदाजित घट (रुपयांत)
सोने (प्रति १० ग्रॅम) १,५३,९६६ १,४२,२२३ ~ ११,७०० 
चांदी (प्रति किलो) २,६२,८२४ २,२६,०९६ ~ ३६,००० 

'बेस इम्पोर्ट प्राईस' घटल्याने काय फरक पडणार?
सोने किंवा चांदी जेव्हा परदेशातून भारतात येते, तेव्हा त्यावर सरकार सीमा शुल्क आकारते. हे शुल्क 'बेस इम्पोर्ट प्राईस'वर मोजले जाते.
कमी कर : बेस प्राईस घटल्यामुळे त्यावर लागणारा कराचा आकडाही आपोआप खाली येतो.
आयात स्वस्त : आयातदारांना आता कमी खर्चात सोने-चांदी भारतात आणता येईल.
किमतीवर दबाव : आयातीचा खर्च कमी झाला की, त्याचा थेट परिणाम किरकोळ बाजारातील किमतींवर होऊन त्या खाली येण्यास मदत होते.

ज्वेलरी उद्योग आणि सामान्य ग्राहकांना दिलासा
ज्वेलरी उद्योगातील व्यापाऱ्यांसाठी ही मोठी सवलत आहे. आयातीचा खर्च कमी झाल्याने त्यांना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी चांगल्या सवलती देता येतील. भारतात लग्नकार्यात सोन्याला मोठी मागणी असते. अशा वेळी किमती स्थिर राहिल्या किंवा कमी झाल्या, तर ग्राहकांच्या खिशावरील भार हलका होईल.

वाचा - शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

गुंतवणूकदारांनी काय करावे?
तज्ज्ञांच्या मते, हा निर्णय किमती स्थिर ठेवण्यासाठी महत्त्वाचा आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेतील घडामोडी, डॉलर-रुपयाचे मूल्य आणि आंतरराष्ट्रीय मागणी यावरही सोन्याचे दर अवलंबून असतात. त्यामुळे किमतीत पूर्णपणे घसरण होईपर्यंत वाट पाहणे योग्य ठरेल. जर दरात मोठी घसरण आली, तर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी ही एक उत्तम संधी ठरू शकते.

Web Title : सोने, चांदी के आयात शुल्क में कटौती! क्या गहनों के दाम घटेंगे?

Web Summary : सरकार ने सोने और चांदी के बेस इम्पोर्ट प्राइस में भारी कटौती की है, जिससे गहनों की कीमतें कम हो सकती हैं। सोने में 11,700 रुपये प्रति 10 ग्राम और चांदी में 36,000 रुपये प्रति किलो की कमी आ सकती है, जिससे उपभोक्ताओं और आभूषण उद्योग को राहत मिलेगी। विशेषज्ञ वैश्विक बाजार के रुझानों पर नजर रखने की सलाह देते हैं।

Web Title : Gold, silver import duty slashed! Jewelry prices to fall?

Web Summary : The government has significantly cut the base import price for gold and silver, potentially lowering jewelry prices. Gold could see a reduction of ₹11,700 per 10 grams and silver ₹36,000 per kg, offering relief to consumers and the jewelry industry during the wedding season. Experts advise watching global market trends.