Free Trade Agreement: एकीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प विविध देशांवर व्यापार शुल्क लादत असताना, दुसरीकडे भारताने काही युरोपीय देशांसोबत मुक्त व्यापार करार केला आहे. ब्रिटननंतर आता भारतानेस्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लेन्स्टरसोबतही मुक्त व्यापार करार केला आहे.
या करारांतर्गत अनेक वस्तू स्वस्त होण्याची अपेक्षा आहे. अहवालानुसार, मुक्त व्यापार करारामुळे संबंधित वस्तुवरील शुल्क काढून टाकले जाईल. यामुळे स्विस घड्याळे आणि चॉकलेट सारख्या वस्तू स्वस्त होतील. स्वित्झर्लंड आणि इतर चार युरोपीय देशांसोबत भारताने केलेला करार सप्टेंबर 2025 पासून लागू केले जाईल.
भारतात मोठी गुंतवणूक येऊ शकते
सध्या भारत स्विस चॉकलेटवर ३० टक्के आयात शुल्क लादतो. असे मानले जाते की, या कराराचा सर्वाधिक फायदा उच्च दर्जाच्या तंत्रज्ञानाला होऊ शकतो. या कराराद्वारे, या चार युरोपीय देशांकडून १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक भारतात येऊ शकते. या करारानंतर औषध कंपन्यांमध्येही मोठी गुंतवणूक येऊ शकते.
मुक्त व्यापार करार म्हणजे काय?
या चार युरोपीय देशांसोबतच्या करारानंतर ९० टक्के वस्तूंवरील शुल्क काढून टाकले जाईल. त्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, भारत हा त्या देशांसाठी बाजारपेठ म्हणून भारतात गुंतवणूक करण्याची एक मोठी संधी असेल. या करारांमध्ये शेतकऱ्यांच्या आणि शेतीशी संबंधित उत्पादनांच्या हिताकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.