Lokmat Money >गुंतवणूक > म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?

म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?

Investment Tips : तुम्ही जर शेअर बाजार, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. कारण, गुंतवणूकदारांचा कल वेगळ्या पर्यायकडे वळत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 13:02 IST2025-08-13T13:01:09+5:302025-08-13T13:02:29+5:30

Investment Tips : तुम्ही जर शेअर बाजार, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. कारण, गुंतवणूकदारांचा कल वेगळ्या पर्यायकडे वळत आहे.

ETF vs. Mutual Funds Why Investors Are Pouring Money into ETFs | म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?

म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?

Investment Tips : गेल्या काही वर्षांपासून देशातील गुंतवणूकदार पारंपरिक बचत पर्यायांना सोडून म्युच्युअल फंड आणि शेअर बाजाराकडे वळले आहेत. एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये होणारी गुंतवणूक दर महिन्याला वाढत असतानाच, आता एक नवीन गुंतवणूक पर्याय जोरदारपणे पुढे येत आहे तो म्हणजे ईटीएफ (ETF). म्युच्युअल फंड आणि स्टॉकऐवजी लोक ईटीएफला का पसंती देत आहेत? चला लगेच जाणून घेऊ. 

ईटीएफमध्ये गुंतवणुकीचा विक्रम
असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) च्या आकडेवारीनुसार, जुलै महिन्यात ईटीएफ (गोल्ड ईटीएफ सोडून) मध्ये तब्बल ४,४७६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. ही रक्कम जून महिन्यातील ८४४ कोटी रुपयांपेक्षा खूप जास्त आहे. याचाच अर्थ, गुंतवणूकदार आता ईटीएफला जास्त महत्त्व देत आहेत. दुसरीकडे, गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक मात्र कमी झाली आहे. जुलैमध्ये १२५६ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली, जी जूनमधील २,०८०.९ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे.

एसआयपी आणि म्युच्युअल फंडांची स्थिती

  • एसआयपी: जुलैमध्ये एसआयपी गुंतवणुकीने पहिल्यांदाच २८,४६४ कोटी रुपयांचा विक्रमी टप्पा गाठला. जूनमध्ये हा आकडा २७,२६९ कोटी रुपये होता.
  • इक्विटी म्युच्युअल फंड: इक्विटी म्युच्युअल फंडमध्येही जुलै महिन्यात ४२,७०२ कोटींची मोठी गुंतवणूक झाली, जी जून महिन्यापेक्षा ८१% जास्त आहे.
  • एकूणच, म्युच्युअल फंड उद्योगाचे व्यवस्थापनाखालील मालमत्ता (AUM) जुलैमध्ये ७५.३६ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे.

वाचा - ३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?

ईटीएफला पसंती का?
ईटीएफमध्ये गुंतवणुकीचे प्रमाण अचानक वाढण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत.

  1. कमी खर्च : म्युच्युअल फंडांच्या तुलनेत ईटीएफमध्ये व्यवस्थापन शुल्क आणि इतर खर्च कमी असतात.
  2. अधिक पारदर्शकता: ईटीएफमध्ये तुमचे पैसे कुठे गुंतवले जात आहेत, याची स्पष्ट माहिती असते, जी काही म्युच्युअल फंडांमध्ये मिळत नाही.
  3. अधिक लवचिकता: तुम्ही स्टॉकप्रमाणेच ईटीएफमध्ये कधीही खरेदी-विक्री करू शकता, ज्यामुळे तरलता चांगली राहते.
  4. सोपी प्रक्रिया: ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे तुलनेने सोपे आणि कमी क्लिष्ट आहे.
  5. चांगला परतावा: अनेकदा ईटीएफने म्युच्युअल फंडांपेक्षा जास्त परतावा दिल्याचे दिसून आले आहे आणि ते स्टॉकपेक्षा सुरक्षित मानले जातात.
  6. या कारणांमुळे गुंतवणूकदार आता ईटीएफला एक चांगला आणि प्रभावी पर्याय म्हणून पाहत आहेत.

Web Title: ETF vs. Mutual Funds Why Investors Are Pouring Money into ETFs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.