Lokmat Money >गुंतवणूक > EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनचं (EPFO) पोर्टल सध्या युजर्ससाठी डोकेदुखी ठरत आहे. लॉग इन पासून पासबुक डाऊनलोड पर्यंतच्या समस्यांमुळे सदस्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 12:21 IST2025-04-28T12:20:36+5:302025-04-28T12:21:37+5:30

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनचं (EPFO) पोर्टल सध्या युजर्ससाठी डोकेदुखी ठरत आहे. लॉग इन पासून पासबुक डाऊनलोड पर्यंतच्या समस्यांमुळे सदस्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

EPFO portal has increased the headache of users Problems are arising from login to passbook download | EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनचं (EPFO) पोर्टल सध्या युजर्ससाठी डोकेदुखी ठरत आहे. लॉग इन पासून पासबुक डाऊनलोड पर्यंतच्या समस्यांमुळे सदस्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सोशल मीडियावर युजर्सचा संताप स्पष्टपणे दिसून येत आहे. देशभरातील लोकांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर यावर नाराजी व्यक्त केली आहे.

समस्या काय आहे?

लॉग इनची समस्या, पासबुक डाऊनलोड न होणं, केवायसी अपडेट्स आणि क्लेम्सना उशीर होणं अशा समस्यांना युजर्सला सामोरं जावं लागत आहे. अनेकदा अकाऊंट लॉग इन करूनही पासबुक मिळत नाही. अनिल सिंह नावाच्या एका युजरनं "मी दोन आठवड्यांपासून उमंग अॅप आणि ईपीएफओ पोर्टलवरून पासबुक डाऊनलोड करण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु ते करता येत नाही. तक्रार करूनही कारवाई होत नाही," असं म्हटलं आहे.

Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

समस्या का उद्भवत आहेत?

ईपीएफओनं नुकतंच आधार-आधारित ट्रान्सफर आणि उमंग अॅप इंटिग्रेशन सारखे नवीन फीचर्स लॉन्च केले आहेत. मात्र, ही यंत्रणा अद्याप पूर्णपणे स्थिरावलेली नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन आयटी सिस्टीम ३.० अपडेट सुरू आहे, ज्यामुळे जुन्या सिस्टीममध्ये अडचणी येत आहेत. या प्रक्रियेला आणखी काही महिने लागू शकतात, तोपर्यंत सदस्यांना संयम बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे. म्हणजेच जोपर्यंत नवी यंत्रणा पूर्णपणे लागू होत नाही, तोपर्यंत जुन्या व्यवस्थेनुसार कामं करावी लागणार आहेत. अशावेळी युजर्सना काही त्रास सहन करावा लागू शकतो.

नव्या व्यवस्थेत काय होणार?

ईपीएफओच्या नव्या प्रणालीत मोठे बदल होणार आहेत. हे बँकिंग सिस्टीमप्रमाणे बनवलं जात आहे, जिथे युजर्सना पैसे काढताना जास्त सूट मिळणार आहे. एका मर्यादेपर्यंत पैसे काढणं, यूपीआय/एटीएमद्वारे व्यवहार करणं अशा सुविधांचा समावेश असेल. तसंच गुंतागुंतीचे नियम काढून प्रक्रिया सोपी करण्यात येणार आहे.

Web Title: EPFO portal has increased the headache of users Problems are arising from login to passbook download

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.