Lokmat Money >गुंतवणूक > EPFO Pension: 10 वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार पेन्शन; पाहा डिटेल्स...

EPFO Pension: 10 वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार पेन्शन; पाहा डिटेल्स...

तुम्ही 10 वर्षे एखाद्या कंपनीत काम केले असेल, तर तुम्हालाही निवृत्तीनंतर पेन्शन मिळू शकते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 15:41 IST2025-01-13T15:40:34+5:302025-01-13T15:41:10+5:30

तुम्ही 10 वर्षे एखाद्या कंपनीत काम केले असेल, तर तुम्हालाही निवृत्तीनंतर पेन्शन मिळू शकते.

EPFO Pension: Employees who have worked for 10 years will also get pension; See details | EPFO Pension: 10 वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार पेन्शन; पाहा डिटेल्स...

EPFO Pension: 10 वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार पेन्शन; पाहा डिटेल्स...

EPFO Pension: निवृत्तीनंतर चांगले आयुष्य जगण्यासाठी अनेकजण तरुण वयापासून बचतीला सुरुवात करतात. आज बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत, ज्यात चांगला परतावा मिळतो. आम्ही तुम्हाला EPFO पेन्शनबद्दल सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हाला वयाच्या 60व्या वर्षी चांगले निवृत्ती वेतन मिळू शकते. विशेष म्हणजे, तुम्ही एखाद्या कंपनीत 10 वर्षेही काम केले असेल, तरीदेखील तुम्हाला निवृत्तीनंतर तिथून मासिक पेन्शन मिळू शकते.

कर्मचारी पेन्शन योजना (EPS)
कर्मचारी पेन्शन योजना EPFO ​​द्वारे 16 नोव्हेंबर 1995 रोजी जारी करण्यात आली होती, ज्या अंतर्गत संघटनात्मक क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मासिक पेन्शन देण्याची योजना तयार करण्यात आली. या योजनेंतर्गत कर्मचारी किती दिवस काम करतो, त्यानुसार पेन्शन निश्चित केली जाते. जर तुम्ही एखाद्या कंपनीत 10 वर्षे काम केले असेल आणि तुमचा PF तिथे जमा असेल तर तुम्हाला मासिक किती पेन्शन मिळते.

EPS साठी पात्रता
जर तुम्ही संघटित क्षेत्रात काम केले असेल, तरच तुम्हाला EPS म्हणजेच कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ मिळेल आणि या योजनेअंतर्गत तुम्हाला किमान 1000 रुपये मासिक पेन्शन मिळेल. मात्र, किमान निवृत्ती वेतनाची रक्कम दरमहा 7500 रुपये करण्याची मागणी अनेक दिवसांपासून सुरू आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कर्मचाऱ्याचे पीएफ खाते असले पाहिजे ज्यामध्ये त्याने नोकरीदरम्यान पैसे जमा केले असावेत. याशिवाय, या योजनेचा लाभ वयाच्या 58 वर्षानंतरच मिळणार आहे. 

EPF सदस्य त्यांच्या मूळ वेतनाच्या 12% EPFO ​​द्वारे PF मध्ये योगदान देतात, तीच रक्कम कंपनी द्वारे देखील जमा केली जाते. कंपनीने जमा केलेली रक्कम दोन भागांमध्ये विभागली आहे, ज्यामध्ये 8.33 टक्के EPS आणि 3.67 टक्के पीएफमध्ये जाते.

एवढी पेन्शन मिळेल
ईपीएस अंतर्गत कर्मचाऱ्यांचे पेन्शन त्यांच्या कामाच्या वेळेनुसार आणि पगाराच्या आधारे ठरवले जाते. आम्ही तुम्हाला 10 वर्षे काम करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या पेन्शनची गणना सांगणार आहोत, ज्याचा मासिक पगार 15 हजार रुपये आहे.

मासिक पेन्शन =  (पेन्शन पात्र वेतन X नोकरीचा कालावधी)/ 70

पेन्शनपात्र पगार = तुमच्या शेवटच्या 60 महिन्यांच्या पगाराची सरासरी

कर्मचाऱ्यांचे पेन्शन या सूत्राद्वारे ठरविले जाते. हे आता एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ.

जर तुम्ही कंपनीत 10 वर्षे काम केले असेल आणि तुमचा पेन्शनपात्र पगार 15,000 रुपये असेल, तर तुम्हाला वयाच्या 58 व्या वर्षापासून 2,143 रुपये मासिक निवृत्ती वेतन मिळेल.

Web Title: EPFO Pension: Employees who have worked for 10 years will also get pension; See details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.