Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली

बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली

EPFO 3.0 PF Withdrawal Rules : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या सदस्यांसाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा सुरू करण्याच्या तयारीत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2026 13:53 IST2026-04-06T13:52:37+5:302026-04-06T13:53:52+5:30

EPFO 3.0 PF Withdrawal Rules : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आपल्या सदस्यांसाठी एक महत्त्वपूर्ण सुविधा सुरू करण्याच्या तयारीत आहे.

EPFO 3.0: Now Withdraw Your PF Money Directly via ATM and UPI by Mid-2026 | बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली

बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली

PF Withdrawal Rules : भविष्य निर्वाह निधी काढण्यासाठी आता सरकारी कार्यालयाचे उंबरठे झिजवण्याचे किंवा लांबच लांब अर्जांची प्रतीक्षा करण्याचे दिवस संपणार आहेत. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या तंत्रज्ञानात आमूलाग्र बदल करत 'EPFO 3.0' ही नवीन प्रणाली सादर केली आहे. या अंतर्गत आता कर्मचाऱ्यांना त्यांच्या पीएफ खात्यातून थेट ATM आणि UPI द्वारे पैसे काढता येणार आहेत. २०२६ च्या मध्यापर्यंत ही सुविधा देशभरात पूर्णपणे लागू होण्याची शक्यता आहे.

महत्त्वाचे बदल जाणून घ्या

  • कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे सहज आणि विनासायास मिळावेत, यासाठी ही डिजिटल क्रांती करण्यात आली आहे. यात खालील प्रमुख सुविधांचा समावेश असेल.
  • ATM आणि UPI द्वारे पैसे काढणे : पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी आता बँक किंवा ईपीएफओ कार्यालयात जाण्याची गरज उरणार नाही.
  • ऑटो-क्लेम सेटलमेंट : पीएफचे दावे आता मानवी हस्तक्षेपाशिवाय संगणकीय प्रणालीद्वारे वेगाने निकाली निघतील.
  • थेट फंड ट्रान्सफर : कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पीएफची रक्कम थेट जमा होईल.
  • UPI वर बॅलन्स चेक : कर्मचारी आता युपीआय ॲप्सच्या मदतीने आपला पीएफ बॅलन्स झटपट पाहू शकतील.

ATM मधून पैसे कसे निघणार?
EPFO आपल्या सदस्यांना एक विशेष ATM कार्ड जारी करणार आहे. हे कार्ड थेट सदस्याच्या पीएफ खात्याशी लिंक असेल. यामुळे आणीबाणीच्या प्रसंगी कर्मचारी थेट एटीएम मशीनवर जाऊन आवश्यक रक्कम काढू शकतील. तसेच, युपीआयच्या सुविधेमुळे बँक खात्यात पैसे ट्रान्सफर करणे अधिक सोपे होईल.

या आहेत महत्त्वाच्या अटी

  • या सुविधेचा लाभ घेण्यासाठी काही तांत्रिक बाबी पूर्ण असणे अनिवार्य आहे.
  • सदस्याचा UAN (Universal Account Number) सक्रिय असणे आवश्यक आहे.
  • युएएन आणि मोबाईल नंबर दोन्ही कार्यान्वित असावेत.
  • युएएन हे आधार, पॅन, बँक खाते आणि IFSC कोडशी लिंक असणे अनिवार्य आहे.

३२ बँकांसोबत भागीदारी
पीएफ प्रक्रिया वेगवान करण्यासाठी EPFO ने स्टेट बँक, एचडीएफसी, आयसीआयसीआय, ॲक्सिस बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा यांसह देशातील ३२ सार्वजनिक आणि खाजगी बँकांशी करार केला आहे. यामुळे नियोक्त्यांना पीएफचे योगदान जमा करणे आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे क्लेम मिळवणे अधिक सुलभ होणार आहे.

वाचा - रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा

'EPFO 3.0' चे मोठे फायदे

  1. त्वरित पैसे: एटीएम आणि युपीआयमुळे पैशांसाठी वाट पाहावी लागणार नाही.
  2. सेटलमेंट मर्यादा वाढली: ऑटोमॅटिक सेटलमेंटची मर्यादा आता १ लाखावरून ५ लाख रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
  3. केंद्रीय पेन्शन प्रणाली: पेन्शन काढण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यात आली आहे.
  4. केवायसी अपडेट: आधार ओटीपीच्या मदतीने वैयक्तिक माहिती क्षणार्धात अपडेट करता येईल.

Web Title : UPI पर PF बैलेंस, तुरंत क्लेम: बैंक जाने की झंझट खत्म!

Web Summary : EPFO ने 'EPFO 3.0' शुरू किया, जिससे ATM/UPI से PF निकासी होगी। ₹5 लाख तक का ऑटो-क्लेम सेटलमेंट। UAN, आधार लिंक करना अनिवार्य। 32 बैंकों की साझेदारी से PF प्रक्रिया सरल, त्वरित पहुंच और आसान KYC अपडेट।

Web Title : PF Balance on UPI, Faster Claims: Banking Hassle Ends!

Web Summary : EPFO introduces 'EPFO 3.0' enabling PF withdrawals via ATM/UPI. Auto-claim settlement up to ₹5 lakhs. UAN, Aadhaar linking mandatory. 32 bank partnerships simplify PF processes, offering quick access and easy KYC updates.