Lokmat Money >गुंतवणूक > EPF Rules Update: आता सहा महिने नाही, तर महिनाभर नोकरी केली तरी मिळणार पेन्शन

EPF Rules Update: आता सहा महिने नाही, तर महिनाभर नोकरी केली तरी मिळणार पेन्शन

EPF New Rules in Marathi: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने नियमात बदल केला असून, आता एक महिना नोकरी करणाऱ्यांनाही पेन्शन मिळण्याचा दरवाजा खुला झाला आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 16:51 IST2025-08-30T16:49:18+5:302025-08-30T16:51:49+5:30

EPF New Rules in Marathi: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने नियमात बदल केला असून, आता एक महिना नोकरी करणाऱ्यांनाही पेन्शन मिळण्याचा दरवाजा खुला झाला आहे. 

EPF Rules Update: Now you will get pension even if you work for a month, not six months | EPF Rules Update: आता सहा महिने नाही, तर महिनाभर नोकरी केली तरी मिळणार पेन्शन

EPF Rules Update: आता सहा महिने नाही, तर महिनाभर नोकरी केली तरी मिळणार पेन्शन

EPF New Rules in India: नोकरदारांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनबद्दल कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने मोठा निर्णय घेतला आहे. आता सहा महिन्यांपेक्षा कमी काळ नोकरी केली असेल, तरीही तो व्यक्ती पेन्शनसाठी पात्र असणार आहे. महिनाभर काम केलेल्या व्यक्तीलाही ईपीएसचा लाभ दिला जाणार आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ईपीएफओ अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेने पेन्शनसंदर्भात असलेल्या नियमात बदल केला आहे. एखाद्या व्यक्तीने सहा महिन्यांपेक्षा कमी काळ नोकरी केली, तर त्याला पेन्शन मिळत नव्हते. झिरो कम्प्लीट ईअर नुसार कर्मचारी पेन्शनसाठी पात्र ठरत नव्हता. 

पाच महिने नोकरी केलेल्या व्यक्तीस पेन्शनचा अधिकार नव्हता. या नियमामध्ये ईपीएफओने महत्त्वाचा बदल केला आहे. नवीन अधिसूचनेनुसार एक महिना नोकरी करणाऱ्या व्यक्तीचा भविष्य निर्वाह निधीतील योगदान वाया जाणार नाही. 

जर एखाद्या व्यक्तीने १ महिना नोकरी केली असेल आणि ईपीएसनुसार त्याचे पैसे भरले गेले असेल, तर त्यालाही पेन्शनचा अधिकार असणार आहे, असे ईपीएफओने स्पष्ट केले आहे. 

तुम्ही पीएफ खातेधारक असाल, तर...

जर तुम्ही ६ महिन्यांच्या आतच राजीनामा दिला. तर पेन्शनसाठी आधी तुमच्या पीएफ पासबुकची चौकशी करा. जर तुमचे पीएफमध्ये पैसे भरले गेले नसेल, तर २०२४ च्या अधिसूचनेनुसार तुम्ही ईपीएफओ कार्यालयात यासंदर्भात तक्रार करावी.

Web Title: EPF Rules Update: Now you will get pension even if you work for a month, not six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.