India-America Relation: भारत आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतासाठी सोमवारी अमेरिकेतून मोठी बातमी आली आहे. युएसस्थित औषध निर्माण कंपनी Eli Lilly and Company ने पुढील काही वर्षांत भारतात तब्बल 1 अब्ज अमेरिकन डॉलर (सुमारे ₹8,879 कोटी) गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ही गुंतवणूक भारतातील कंपनीचे उत्पादन आणि पुरवठा क्षमता आणखी मजबूत करेल.
हैदराबादमध्ये नवीन सेंटर उभारणार
कंपनीने दिलेल्या अधिकृत निवेदनानुसार, या गुंतवणुकीअंतर्गत हैदराबादमध्ये एक नवीन उच्च-तंत्रज्ञानयुक्त सेंटर (facility) स्थापन करण्यात येणार आहे. हे केंद्र Lillyच्या भारतीय आणि जागतिक उत्पादन नेटवर्कसाठी हाय-क्वालिटी तांत्रिक सहाय्य आणि मॅन्युफॅक्चरिंग सपोर्ट देईल. हा निर्णय भारताला जागतिक औषधनिर्मिती आणि पुरवठा साखळीतील एक प्रमुख केंद्र म्हणून अधोरेखित करतो.
मौन्जारोच्या यशानंतर वाढलेला भारतावरील विश्वास
Eli Lilly ने यावर्षी भारतात वजन घटवण्यासाठी आणि डायबिटीजसाठीची “Mounjaro” ही औषध सादर केली होती, ज्याची जागतिक मागणी झपाट्याने वाढली आहे. विश्लेषकांच्या मते, ही गुंतवणूक कंपनीला स्थिर पुरवठा साखळी निर्माण करण्यास मदत करेल, विशेषतः स्थुलपणा आणि डायबिटीजच्या औषधांच्या वाढत्या बाजारपेठेत.
भारतीय औषध उद्योगावर वाढता विश्वास
Eli Lillyच्या मते, ही गुंतवणूक तेलंगणातील स्थानिक औषध उत्पादकांशी भागीदारीत केली जाणार आहे. यामुळे भारतात केवळ उत्पादन क्षमतेत वाढ होणार नाही, तर महत्त्वाच्या औषधांची उपलब्धताही सुधारेल. यामध्ये स्थुलपणा, मधुमेह, अल्झायमर, कर्करोग आणि इम्युनिटीसंबंधित आजारांवरील औषधांचा समावेश असेल.
Eli Lilly International चे कार्यकारी उपाध्यक्ष पॅट्रिक जॉन्सन यांनी म्हटले की, “आम्ही जागतिक स्तरावर उत्पादन आणि औषध पुरवठा क्षमतांच्या विस्तारासाठी मोठी गुंतवणूक करत आहोत आणि भारत आमच्या ग्लोबल नेटवर्कमधील क्षमतावृद्धीचा केंद्रबिंदू आहे.”
रेवंत रेड्डी आणि उद्योगमंत्र्यांची प्रतिक्रिया
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी म्हणाले की, “हैदराबादमधील Lillyचा सततचा विस्तार हे दर्शवतो की हा शहर ग्लोबल हेल्थ आणि फार्मा इनोव्हेशन्सचा शक्तिशाली केंद्रबिंदू बनत आहे. तेलंगणामध्ये तंत्रज्ञानावर आधारित विकास, गुंतवणुकीला अनुकूल वातावरण आणि व्यापार सुलभतेवर दिलेले लक्ष हे बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांना येथे येण्यासाठी मुख्य आकर्षण ठरत आहे.”