Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?

धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?

Dhanteras 2025: सोन्याचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी, १७ ऑक्टोबर, शुक्रवार रोजी, २४ कॅरेट सोन्याचा दर १३,२७७ रुपये प्रति ग्रॅम होता. मात्र त्यात आता मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 11:19 IST2025-10-18T11:18:34+5:302025-10-18T11:19:25+5:30

Dhanteras 2025: सोन्याचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी, १७ ऑक्टोबर, शुक्रवार रोजी, २४ कॅरेट सोन्याचा दर १३,२७७ रुपये प्रति ग्रॅम होता. मात्र त्यात आता मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

Dhanteras 2025 Will buying gold on Dhanteras be profitable will the bullish trend continue What do experts say | धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?

धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?

Dhanteras 2025: सोन्याचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. धनत्रयोदशीच्या एक दिवस आधी, १७ ऑक्टोबर, शुक्रवार रोजी, २४ कॅरेट सोन्याचा दर १३,२७७ रुपये प्रति ग्रॅम होता. तर, २२ कॅरेट सोनं १२,१७० रुपये प्रति १० ग्रॅम स्तरावर होतं. १८ कॅरेट सोनं ९,९५८ रुपये प्रति १० ग्रॅम स्तरावर होतं. सोन्याच्या गगनाला भिडलेल्या किंमतींमध्ये या वेळी गुंतवणूक करणे योग्य ठरेल का? या धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणे फायदेशीर ठरेल का? चला जाणून घेऊया.

सोन्याचे दर १५८% वाढले

मागील दिवाळीपासून आतापर्यंत सोन्याच्या दरात जोरदार तेजी दिसून आली आहे. एकट्या या वर्षात सोन्याचा भाव ३९ वेळा आपल्या सर्वकालीन उच्चांकावर (all-time high) पोहोचला आहे. १ नोव्हेंबर २०२२ रोजी सोन्याचा दर ५०,४४१ रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो १७ ऑक्टोबर २०२५ रोजी १,३०,२३३ रुपये प्रति १० ग्रॅम स्तरावर पोहोचला आहे. म्हणजेच, या काळात सोन्याचा भाव १५८ टक्क्यांनी वाढला आहे.

काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा

तज्ज्ञांचं मत काय आहे?

'बिझनेस स्टँडर्ड'च्या रिपोर्टनुसार, बाजारपेठेशी संबंधित तज्ज्ञ आलोक जैन म्हणतात की, शुक्रवारी सोन्याचा दर ४,३८० डॉलर प्रति औंस होता, तर एका आठवड्यापूर्वी तो ४,००० डॉलरच्या खाली ट्रेड करत होता. दरांमध्ये ज्या वेगानं बदल होत आहे, तो चांगला असला तरी चिंताजनक देखील आहे. कोणतीही मालमत्ता जेव्हा इतक्या वेगानं पुढे जाते, तेव्हा ती आर्थिक व्यवस्थेतील मोठ्या संकटाचेही संकेत देते.

तेजीची अपेक्षा कायम

जरी अलीकडच्या काळात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असली तरी, फेस्टिव्ह सीझननंतर लग्नसराईचा सीझन सुरू होणार असल्यानं देशांतर्गत बाजारात सोन्याची मागणी कायम राहील. तसंच, सेंट्रल बँक (मध्यवर्ती बँक) देखील सोन्यावर मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. अशा परिस्थितीत, सोन्याचा भाव भविष्यातही वाढताना दिसू शकतो.

दोन महिन्यांत सोन्या-चांदीच्या दरात वाढ

केवळ दोन महिन्यांतच सोन्याचा भाव १ लाख रुपयांवरून १.३० लाख रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. त्याचबरोबर, चांदीचा भाव ११० रुपये प्रति ग्रॅमवरून १८० रुपये प्रति ग्रॅम झाला आहे.

Web Title : धनतेरस पर सोना खरीदना: क्या यह अच्छा विचार है? विशेषज्ञों का आकलन

Web Summary : पिछली दिवाली से सोने की कीमतों में 158% की वृद्धि हुई है। विशेषज्ञों का कहना है कि कीमतों में तेजी आर्थिक चिंताओं का संकेत है। त्योहारी और शादी के सीजन की मांग, साथ ही केंद्रीय बैंकों द्वारा खरीदारी, हालिया लाभ के बावजूद ऊपर की प्रवृत्ति को बनाए रख सकती है।

Web Title : Dhanteras Gold Buying: Good Idea? Experts Weigh In on Price Surge

Web Summary : Gold prices surged 158% since last Diwali. Experts note rapid price increases signal potential economic concerns. Festive and wedding season demand, plus central bank buying, may sustain the upward trend despite recent gains.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.