Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > Punjab National Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४९,८६६ चं फिक्स व्याज, मिळणार गॅरेंटीही

Punjab National Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४९,८६६ चं फिक्स व्याज, मिळणार गॅरेंटीही

PNB FD Schemes: पंजाब नॅशनल बँक ही एक सरकारी बँक असून भारत सरकार तिचं नियंत्रण करते. ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांसाठी एफडी खात्यांवर आकर्षक व्याजदर ऑफर करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 14:19 IST2026-03-18T13:56:51+5:302026-03-18T14:19:29+5:30

PNB FD Schemes: पंजाब नॅशनल बँक ही एक सरकारी बँक असून भारत सरकार तिचं नियंत्रण करते. ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांसाठी एफडी खात्यांवर आकर्षक व्याजदर ऑफर करत आहे.

Deposit rs 100000 in Punjab National Bank and get a fixed interest of rs 49866 you will also get a guarantee | Punjab National Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४९,८६६ चं फिक्स व्याज, मिळणार गॅरेंटीही

Punjab National Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४९,८६६ चं फिक्स व्याज, मिळणार गॅरेंटीही

PNB FD Schemes: पंजाब नॅशनल बँक ही एक सरकारी बँक असून भारत सरकार तिचं नियंत्रण करते. ही सरकारी बँक आपल्या ग्राहकांसाठी एफडी खात्यांवर आकर्षक व्याजदर ऑफर करत आहे. पीएनबी आपल्या ग्राहकांना ३.०० टक्क्यांपासून ते ७.४० टक्क्यांपर्यंत बंपर व्याज देत आहे. या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत तुम्ही किमान ७ दिवसांपासून ते कमाल १० वर्षांच्या कालावधीसाठी एफडीमध्ये गुंतवणूक करू शकता. पीएनबीमध्ये १ लाख रुपये जमा केल्यावर ४९,८६६ रुपयांपर्यंतचे निश्चित व्याज कसं मिळेल, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

४४४ दिवसांच्या एफडी योजनेवर सर्वाधिक व्याज

देशातील मोठी लोकसंख्या आजही बँक एफडीलाच सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानते. एफडी खात्यांमध्ये एका निश्चित कालावधीनंतर गॅरंटीड व्याजासह संपूर्ण पैसे परत मिळतात. पंजाब नॅशनल बँक आपल्या ४४४ दिवसांच्या विशेष एफडी योजनेवर सर्वाधिक व्याज देत आहे. या योजनेअंतर्गत सामान्य नागरिकांना ६.६० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७.१० टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना (८० वर्षांवरील) ७.४० टक्के व्याज दिले जात आहे. पीएनबीनं नुकतीच या ४४४ दिवसांच्या विशेष योजनेची सुरुवात केली आहे.

PNB ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी: १५ एप्रिलपर्यंत 'हे' काम पूर्ण करा, अन्यथा बँक खातं होईल बंद

₹१,००,००० वर ₹४९,८६६ पर्यंत फिक्स व्याज

पंजाब नॅशनल बँक ५ ते १० वर्षांच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांना ६.०० टक्के, तर ज्येष्ठ आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ६.८० टक्के व्याज देत आहे. जर एखाद्या सामान्य नागरिकाने पीएनबीमध्ये ६ वर्षांच्या एफडीमध्ये १ लाख रुपये जमा केले, तर त्याला ४२,९५० रुपये व्याजासह एकूण १,४२,९५० रुपये मिळतील. 

जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि ६ वर्षांसाठी १ लाख रुपये गुंतवले, तर मुदतपूर्तीनंतर तुम्हाला ४९,८६६ रुपये व्याजासह एकूण १,४९,८६६ रुपये मिळतील. त्याचप्रमाणे, अति ज्येष्ठ नागरिकांनाही १ लाख रुपयांच्या ६ वर्षांच्या एफडीवर ४९,८६६ रुपये निश्चित व्याज आणि एकूण १,४९,८६६ रुपये मिळतील.

Web Title : PNB फिक्स्ड डिपॉजिट: ₹1 लाख जमा करें, ₹49,866 ब्याज की गारंटी पाएं

Web Summary : पंजाब नेशनल बैंक आकर्षक एफडी दरें प्रदान करता है, जो 7.40% तक हैं। 444 दिनों की विशेष एफडी योजना उच्च रिटर्न देती है। छह साल के लिए ₹1 लाख का निवेश वरिष्ठ नागरिकों के लिए ₹49,866 तक ब्याज दिला सकता है।

Web Title : PNB Fixed Deposit: Invest ₹1 Lakh, Earn Guaranteed ₹49,866 Interest

Web Summary : Punjab National Bank offers attractive FD rates, up to 7.40%. A 444-day special FD scheme provides high returns. Investing ₹1 lakh for six years can yield up to ₹49,866 in interest for senior citizens.