Gold Silver Price Today: लग्नसराईच्या या हंगामात सोन्या-चांदीच्या दरात सुरू असलेल्या घसरणीला आज ब्रेक लागला आहे. आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी दिसून आली.
आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹१,२६८ नं महाग होऊन ₹१,२३,४४८ प्रति १० ग्रॅम वर पोहोचलाय. जीएसटीसह १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा आजचा दर ₹१,२७,१५१ पर्यंत गेलाय. तर, चांदीचा भाव जीएसटीसह ₹१,६०,९८९ प्रति किलो वर पोहोचला आहे. जीएसटीशिवाय चांदीचा दर आज ₹२,५९४ नं उसळून ₹१,५६,३०० प्रति किलो दराने उघडला.
मंगळवारी बाजार बंद झाला तेव्हा जीएसटीशिवाय चांदीचा भाव ₹१,५३,७०६ प्रति किलो आणि सोन्याचा भाव ₹१,२२,१८० प्रति १० ग्रॅम होता.
उच्चांकी दरापेक्षा अजूनही स्वस्त
सध्या सोन्याचा भाव १७ ऑक्टोबरच्या सर्वकालीन उच्चांकी दर ₹१,३०,८७४ पेक्षा ₹७,४२६ रुपयांनी स्वस्त आहे. तर, चांदीचे दर १४ ऑक्टोबरच्या उच्चांकी दर ₹१,७८,१०० पासून ₹२१,८०० रुपयांनी खाली आले आहेत.
कॅरेटनुसार सोन्याचे आजचे दर
२३ कॅरेट सोन्याचे दर आज ₹१,२६३ नं महाग होऊन ₹१,२२,९५४ प्रति १० ग्रॅम दरानं उघडला. जीएसटीसह याची किंमत आता ₹१,२६,६४२ झाली आहे.
२२ कॅरेट सोन्याचे दर ₹१,१६१ नं वाढून ₹१,१३,०७८ प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. जीएसटीसह हा दर ₹१,१६,४७० आहे.
१८ कॅरेट सोन्याचा दर ₹९५१ च्या तेजीसह ₹९२,५८६ प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. जीएसटीसह याची किंमत ₹९५,३६३ प्रति १० ग्रॅम आहे.
१४ कॅरेट सोन्याचा दरही ₹७४२ नं वाढला आहे. आज हा ₹७२,२१७ दरानं उघडला आणि जीएसटीसह ₹७४,३८३ वर आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) दिवसातून दोनदा दर जारी करते, एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि एकदा संध्याकाळी ५ च्या आसपास दर जारी केले जातात.
