DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी महंगाई भत्त्यात (DA) 3 टक्क्यांची वाढ करण्यास मंजुरी दिली. त्याचबरोबर पेंशनर्ससाठी महंगाई रिलीफ (DR) मध्येही 3% वाढ करण्यात आली आहे. या निर्णयानंतर आता महागाई भत्ता 55 टक्क्यांवरून 58 टक्के झाला आहे. ही वाढ 1 जुलै 2025 पासून लागू होईल.
2025 ची दुसरी मोठी वाढ
कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या पगारासह जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याची थकबाकी मिळेल. याचा अर्थ कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी लक्षणीय पगार वाढ झाली आहे. ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना लागू असेल. या वर्षी महागाई भत्त्यात झालेली ही दुसरी वाढ आहे. सरकारकडून वर्षातून दोनदा महागाई भत्त्यात सुधारणा केली जाते.
पगार किती वाढेल?
₹30,000 मूळ पगार असलेल्या कर्मचाऱ्याला दरमहा अतिरिक्त ₹900 मिळतील, तर ₹40,000 पगार असलेल्या कर्मचाऱ्याला अतिरिक्त ₹1,200 मिळतील. महत्वाचे म्हणजे, तीन महिन्यांच्या थकबाकीसह कर्मचाऱ्यांसाठी यंदाची दिवाळी अतिशय उत्साहात जाणार आहे.
महागाई भत्ता वाढ सीपीआय-आयडब्ल्यू डेटावर अवलंबून असते
ही वाढ सातव्या वेतन आयोगानुसार सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांवर, पेंशनर्स आणि कुटुंब पेंशनर्सवर लागू होईल. सरकार दरवर्षी महंगाई भत्ता दोन वेळा (जानेवारी आणि जुलै) वाढवते, ज्यामध्ये औद्योगिक कामगारांसाठी CPI-IW (All India Consumer Price Index for Industrial Workers) चे आकडे आधार घेतले जातात. विशेष म्हणजे, पुढील वर्षी, जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात भरगोस वाढ अपेक्षित आहे.