Lokmat Money >गुंतवणूक > निखिल कामत-गौरी खानसारख्या दिग्गजांनी केली ₹8,329 कोटींची गुंतवणूक, काय आहे सुबको?

निखिल कामत-गौरी खानसारख्या दिग्गजांनी केली ₹8,329 कोटींची गुंतवणूक, काय आहे सुबको?

दिग्गज गुंतवणूकदारांनी या 'कॉफी चेन'मध्ये केली गुंतवणूक.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 04:42 PM2024-03-28T16:42:49+5:302024-03-28T16:43:31+5:30

दिग्गज गुंतवणूकदारांनी या 'कॉफी चेन'मध्ये केली गुंतवणूक.

Celebrities like Nikhil Kamat and Gauri Khan invested ₹8,329 crore in subco; See details | निखिल कामत-गौरी खानसारख्या दिग्गजांनी केली ₹8,329 कोटींची गुंतवणूक, काय आहे सुबको?

निखिल कामत-गौरी खानसारख्या दिग्गजांनी केली ₹8,329 कोटींची गुंतवणूक, काय आहे सुबको?

भारतात अनेक मोठे गुंतवणूकदार आहेत, जे विविध स्टार्टअपमध्ये पैसे लावतात. अशाच एका स्टार्टअपचे नाव आहे 'सुबको'(Subco). ही एक प्रसिद्ध कॉफी चेन असून, यात झिरोधाचे संस्थापक निखिल कामथ (Zerodha Nikhil Kamath) यांच्यासह ब्लूम फाऊंडर्स फंड, द गौरी खान फॅमिली ट्रस्ट, प्रिया अँड जॉन अब्राहम, संगीता जिंदाल यांसारख्या मोठ्या गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली आहे. यातकामत यांचा वाटा सर्वाधिक आहे.

या गुंतवणुकीतून कंपनीने सुमारे $10 मिलियन (सुमारे 8,329 कोटी रुपये) निधी उभारला आहे. या निधीसह स्टार्टअपचे पोस्ट मनी व्हॅल्युएशन $34 मिलियनवर पोहोचले आहे. सुबकोने एका निवेदनात म्हटले की, ही रक्कम कर्मचाऱ्यांची भरती, फ्लॅगशिप स्टोअर्स, उत्पादने वाढवणे, रिसर्च अँड डेव्हलोपमेंटसह 'रेडी-टू-ड्रिंक' कॉफी उत्पादने लॉन्च करण्यासाठी वापरली जाईल. सुबकोचे सीईओ राहुल रेड्डी यांनी सर्व गुंतवणूकदारांचे आभार मानले.

दरम्यान, निखिल कामत यांनी सुबकोशी स्पर्धा करणाऱ्या 'थर्ड वेव्ह कॉफी'मध्येही गुंतवणूक केली आहे. याशिवाय कामत यांच्याकडे एक मोठा गुंतवणूक पोर्टफोलिओ आहे, ज्यात विविध क्षेत्रातील अनेक कंपन्यांचा समावेश आहे. 

 

Web Title: Celebrities like Nikhil Kamat and Gauri Khan invested ₹8,329 crore in subco; See details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.