Cdsl and Bse share price: भारतीय शेअर बाजारात पुन्हा एकदा तेजीचं सत्र सुरू झालंय. आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी शेअर बाजारात तेजी दिसून आली. या काळात काही शेअर्सनी ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला. यामध्ये सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस लिमिटेड (CDSL) आणि बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) यांचा समावेश आहे. गुरुवारी या दोन्ही शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी झाली. गेल्या काही दिवसांपासून सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये तेजी आहे.
शेअरची कामगिरी कशी?
गुरुवारी, कामकाजादरम्यान ५ डिसेंबर रोजी सीडीएसएलचा शेअर १० टक्क्यांनी वधारला. यावेळी कंपनीचा शेअर १८६५.४ रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचला. गेल्या महिन्याभरात हा शेअर १९ टक्क्यांनी वधारला आहे. तर बीएसईचे शेअर्सही १२ टक्क्यांनी वधारले आणि ५१६८.९ रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचले. गेल्या महिनाभरात बीएसईच्या शेअरमध्ये आतापर्यंत ९ टक्के वाढ झाली आहे. वर्ष २०२४ मध्ये बीएसईच्या शेअरनं १२८% पर्यंत परतावा दिला आहे.
मोतीलाल ओस्वालच्या शेअरमध्येही तेजी
मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअरमध्येही गुरुवारी मोठी उसळी दिसून आली. या शेअरनं इंट्राडे मध्ये १०१६ रुपयांचा उच्चांक गाठला आणि आता तो १०६४ रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. मोतीलाल ओसवाल यांच्या शेअरमध्ये गेल्या महिन्याभरात ६ टक्के वाढ झाली आहे. एंजल वनचा शेअरही गुरुवारी ३.५ टक्क्यांनी वधारला. गेल्या महिनाभरात या शेअरमध्ये ८ टक्क्यांची वाढ झाली असली तरी ३८९६ रुपयांच्या विक्रमी उच्चांकी पातळीपासून तो अजूनही २० टक्क्यांनी दूर आहे.
काय म्हणतात तज्ज्ञ?
स्वस्तिका इन्व्हेस्टमार्टचे वरिष्ठ तांत्रिक विश्लेषक प्रवेश गौर म्हणाले की, सीडीएसएल क्लासिकल पाऊल उचलत आहे. नजीकच्या मुदतीपासून अल्पावधीपर्यंत गुंतवणूकदार २०५० किंवा २२०० रुपयांच्या टार्गेटसाठी सध्याच्या १८२० रुपयांच्या पातळीवर १६०० रुपयांच्या स्टॉपलॉससह पोझिशन घेऊ शकतो.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)