Lokmat Money >गुंतवणूक > Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?

Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?

Gold Silver Price 24 September: सराफा बाजारात सोने-चांदीच्या किमतीत थोडी घसरण दिसून आली. पाहा काय आहे सोन्या चांदीचे नवे दर.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 14:24 IST2025-09-24T14:23:44+5:302025-09-24T14:24:28+5:30

Gold Silver Price 24 September: सराफा बाजारात सोने-चांदीच्या किमतीत थोडी घसरण दिसून आली. पाहा काय आहे सोन्या चांदीचे नवे दर.

Big drop in gold and silver prices 24 September during Navratri should we buy now or wait for it to become even cheaper | Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?

Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?

Gold Silver Price 24 September: सराफा बाजारात सोने-चांदीच्या किमतीत थोडी घसरण दिसून आली. सणासुदीच्या हंगामात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम २७० रुपयांनी स्वस्त झाला आहे. तर चांदीमध्येही प्रति किलो ३६२ रुपयांची घसरण झाली आहे. बुलियन मार्केटमध्ये आज जीएसटीशिवाय सोनं १,१४,०४४ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. तर, चांदी जीएसटीशिवाय १,३४,९०५ रुपयांवर उघडली. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा भाव आता १,१७,४६५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी १,३८,९५२ रुपये प्रति किलोवर आहे.

आयबीजेएनुसार मंगळवारी जीएसटीशिवाय सोने १,१४,३१४ रुपयांवर बंद झाले होतं. दुसरीकडे, चांदी जीएसटीशिवाय १,३५,२६७ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि दुसऱ्यांदा सायंकाळी ५ च्या आसपास दर जारी केले जातात.

टाटा ग्रुपचा शेअर सुसाट; पहिल्यांदाच स्टॉक स्प्लिट करणार, ₹८५०० पार पोहोचला शेअर

या सप्टेंबर महिन्यात सोनं प्रति १० ग्रॅम ११,६५६ रुपयांनी महाग झालं आहे. तर, चांदीच्या किमतीत प्रति किलो १७,३३३ रुपयांची वाढ झाली आहे. आयबीजेएच्या दरानुसार, ऑगस्टच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सोने प्रति १० ग्रॅम १,०२,३८८ रुपयांच्या दरावर बंद झालं होतं. चांदीही १,१७,५७२ रुपये प्रति किलोच्या दरावर बंद झाली होती.

कॅरेटनुसार आज सोन्याचे भाव

आज २३ कॅरेट सोनंही २६९ रुपयांनी कमी होऊन १,१३,५८७ रुपये प्रति १० ग्रॅमच्या भावानं उघडलं. जीएसटीसह त्याची किंमत आता १,१६,९९४ रुपये झाली आहे. यामध्ये अद्याप मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.

२२ कॅरेट सोन्याची किंमत

२२ कॅरेट सोन्याची किंमत २४८ रुपयांनी घसरून १,०४,४६४ रुपये प्रति १० ग्रॅमवर आली आहे. जीएसटीसह ती १,०७,५९७ रुपये झालीये.

१८ कॅरेट सोन्याची किंमत

आज १८ कॅरेट सोन्याची किंमत २०३ रुपयांनी घसरून ८५,५३३ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडली आणि जीएसटीसह ती ८८,०९८ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे.

१४ कॅरेट सोन्याचा भाव

१४ कॅरेट सोनं १५८ रुपयांनी महाग होऊन ६६,७१६ रुपयांवर उघडलं आणि आता जीएसटीसह ६८,७१७ रुपयांवर पोहोचलंय.

घसरणीची कारणं कोणती?

तज्ज्ञांचं मत आहे की, डॉलर निर्देशांक आणि जागतिक वित्तीय बाजारातील चढ-उतार तसेच अमेरिकन मुख्य पीसीई महागाईच्या आकडेवारीच्या प्रतीक्षेमुळे या आठवड्यात सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये अस्थिरता कायम राहू शकते.

सोनं खरेदी करावं की वाट पाहावी?

पृथ्वी फायनामार्ट कमोडिटी रिसर्चचे मनोज कुमार जैन यांच्यानुसार सोन्याची खरेदी ₹१,१२,५०० च्या आसपास करणे फायदेशीर ठरू शकते. त्यांनी ₹१,११,८८० वर स्टॉप लॉस आणि ₹१,१४,४०० हे टार्गेट दिलं आहे. चांदीमध्ये नवीन लाँग (खरेदी) पोझिशन सुरू करण्यासाठी किमतीत घसरणीची वाट पाहण्याचा सल्ला दिला आहे.

Web Title: Big drop in gold and silver prices 24 September during Navratri should we buy now or wait for it to become even cheaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.