Gold Silver Price 24 July: सोने आणि चांदीच्या किमती आज त्यांच्या आजवरच्या उच्चांकी स्तरावरून मोठ्या प्रमाणात घसरल्या. आज सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम १४२६ रुपयांची मोठी घसरण झाली. त्याच वेळी, चांदीच्या किमतीत प्रति किलो १३०० रुपयांची घसरण झाली आहे. सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्यासाठी १० ग्रॅमसाठी जीएसटीसह १०२०८० रुपये मोजावे लागत आहेत, तर चांदी ११७९८६ रुपये प्रति किलोनं विकली जात आहे. बुधवारी, जीएसटीशिवाय चांदीचा दर प्रति किलो ११५८५० रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला. तर, सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम १००५३३ रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ९९१०७ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर, चांदीचा भाव प्रति किलो ११४५५० रुपयांवर उघडला.
जुलैमध्ये चांदीत १० हजारांची तेजी
जुलैमध्ये चांदीचा वेग सोन्यापेक्षा खूपच जास्त होता. या काळात सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम ३२२१ रुपयांनी वाढला, तर चांदीचा दर १०३४० रुपयांनी वाढला. आयबीजेए दरानुसार, ३० जून रोजी सोनं प्रति १० ग्रॅम ९५८८६ रुपयांवर बंद झाले. तर, चांदी १०५५१० रुपये प्रति किलो दराने विकली गेली. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही.
बँकांकडून १२ लाख कोटींचे कर्ज बुडीत, कर्जाची रक्कम बँकांना परत मिळण्याची शक्यता कमी
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सोने आणि चांदीच्या स्पॉट किमती जाहीर केल्या आहेत. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असण्याची शक्यता आहे. IBJA दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि दुसरी संध्याकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केले जातात.
१८ ते २३ कॅरेट सोन्याचा भाव काय?
तर २३ कॅरेट सोन्याचा भाव १४२० रुपयांनी घसरून ९८७१० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. जीएसटीमुळे त्याची किंमत आता १०१६७१ रुपये झाली आहे. यामध्ये मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. २२ कॅरेट सोन्याचा भाव १३०६ रुपयांनी कमी होऊन ९०७८२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. जीएसटीसह तो ९३,५०५ रुपये झाला आहे. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव १०७० रुपयांनी घसरून ७४३३० रुपये झाला असून जीएसटीमुळे तो ७६५५९ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचलाय.