Bank of Baroda FD : शेअर बाजारातील अस्थिरतेच्या काळात आजही अनेक गुंतवणूकदार सुरक्षित आणि खात्रीशीर परताव्यासाठी मुदत ठेव योजनेला पसंती देतात. जर तुम्ही सुरक्षिततेसोबतच चांगल्या परताव्याच्या शोधात असाल, तर 'बँक ऑफ बडोदा'ची ५ वर्षांची एफडी योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी ही योजना अधिक लाभदायी आहे.
बँक ऑफ बडोदा: सध्याचे व्याजदर
बँकेने वेगवेगळ्या वयोगटातील ग्राहकांसाठी आकर्षक व्याजदर निश्चित केले आहेत.
सामान्य नागरिक : ६.३०% प्रति वर्ष.
ज्येष्ठ नागरिक : ६.९०% प्रति वर्ष.
अति ज्येष्ठ नागरिक : ७.००% प्रति वर्ष.
(टीप: ३ वर्षांहून अधिक आणि ५ वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी हे दर लागू आहेत.)
५ लाखांच्या गुंतवणुकीवर किती मिळणार परतावा?
बँक ऑफ बडोदामध्ये व्याजाची गणना 'त्रैमासिक चक्रवाढ' पद्धतीने केली जाते. म्हणजेच दर ३ महिन्यांनी तुमच्या मुदलात व्याज जमा होते.
१. सामान्य नागरिक (व्याजदर ६.३०%):
गुंतवणूक : ५,००,००० रुपये
मिळालेले एकूण व्याज : १,८३,४५० रुपये
मॅच्युरिटी रक्कम : ६,८३,४५० रुपये
२. ज्येष्ठ नागरिक (व्याजदर ६.९०%)
मिळालेले एकूण व्याज : २,०३,९२१ रुपये
मॅच्युरिटी रक्कम : ७,०३,९२१ रुपये
३. अति ज्येष्ठ नागरिक (व्याजदर ७.००%):
मिळालेले एकूण व्याज : २,०७,३८९ रुपये
मॅच्युरिटी रक्कम : ७,०७,३८९ रुपये
एफडी वरील व्याजावर 'कर' किती?
- मुदत ठेवीतून मिळणारे उत्पन्न हे पूर्णपणे करमुक्त नसते. त्याबाबतचे नियम खालीलप्रमाणे आहेत.
- इन्कम टॅक्स स्लॅब: एफडीमधून मिळणारे व्याज तुमच्या एकूण उत्पन्नात जोडले जाते आणि तुमच्या टॅक्स स्लॅबनुसार त्यावर कर आकारला जातो.
- ज्येष्ठ नागरिकांना सवलत: 'कलम 80TTB' अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींवरील ५०,००० रुपयांपर्यंतच्या व्याजावर कर सवलत मिळते (जुनी कर रचना निवडल्यास).
- कलम 80C: ५ वर्षांच्या टॅक्स सेव्हर एफडीमध्ये गुंतवणूक केल्यास दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर वजावट मिळते.
