Bank of Baroda Savings Scheme : सध्या भारतीय बाजारात अनेक बँका मुदत ठेवीवर चांगले व्याजदर देत आहेत. यामध्ये सरकारी क्षेत्रातील मोठी बँक असलेल्या बँक ऑफ बडोदाकडून ग्राहकांना आकर्षक व्याजदरांची ऑफर दिली जात आहे. बँक ऑफ बडोदामध्ये किमान ७ दिवसांपासून ते कमाल १० वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी एफडी खाते उघडता येते. बँक ऑफ बडोदा एफडी खात्यांवर ३.५० टक्क्यांपासून ते ७.२० टक्क्यांपर्यंत व्याज देत आहे. या योजनेत तुम्ही फक्त २ लाख जमा करून ८४,३४९ रुपयांपर्यंत निश्चित आणि गॅरंटीड व्याज मिळवू शकता.
४४४ दिवसांच्या FD वर सर्वाधिक व्याज
बँक ऑफ बडोदा आपल्या ग्राहकांना ठराविक कालावधीनंतर निश्चित व्याजासह संपूर्ण जमा केलेली रक्कम परत मिळवण्याची संधी देत आहे. बँक ऑफ बडोदा ४४४ दिवसांच्या एफडीवर सर्वाधिक व्याज देत आहे. यामध्ये सामान्य नागरिकांना ६.६० टक्के, ज्येष्ठ नागरिक ७.१० टक्के आणि सुपर ज्येष्ठ नागरिक (८० वर्षांवरील) यांना ७.२० टक्के व्याजदर मिळत आहे.
५ वर्षांच्या FD वर ७.१०% पर्यंत व्याज
बँक ऑफ बडोदा ५ वर्षांच्या मुदतीच्या एफडीवर देत असलेले व्याजदर खालीलप्रमाणे आहेत.
| ग्राहक श्रेणी | ५ वर्षांसाठी व्याजदर |
| सामान्य नागरिक | ६.४० टक्के |
| ज्येष्ठ नागरिक | ७.०० टक्के |
| सुपर ज्येष्ठ नागरिक | ७.१० टक्के |
२,००,००० रुपये जमा केल्यास किती फायदा?
जर तुम्ही बँक ऑफ बडोदामध्ये ५ वर्षांच्या एफडी योजनेत २,००,००० रुपये जमा केले, तर मॅच्युरिटीवर तुम्हाला मिळणारी रक्कम खालीलप्रमाणे असेल.
| ग्राहक श्रेणी | वार्षिक व्याजदर (५ वर्षांसाठी) | व्याजाची निश्चित रक्कम | मॅच्युरिटीवर मिळणारी एकूण रक्कम |
| सामान्य नागरिक (६० वर्षांखालील) | ६.४०% | ७४,७२९ रुपये | २,७४,७२९ रुपये |
| ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांवरील) | ७.००% | ८२,९५६ रुपये | २,८२,९५६ रुपये |
| सुपर ज्येष्ठ नागरिक (८० वर्षांवरील) | ७.१०% | ८४,३४९ रुपये | २,८४,३४९ रुपये |

वाचा - सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
सुपर ज्येष्ठ नागरिकांनी २ लाख जमा केल्यास, त्यांना ५ वर्षांत ८४,३४९ रुपयांचा निश्चित व्याज परतावा मिळेल. सुरक्षित गुंतवणुकीसाठी ही FD योजना एक चांगला पर्याय ठरू शकते.