Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money >गुंतवणूक > बँक ऑफ बडोदाची विशेष मुदत ठेव योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा २ लाखांहून अधिक व्याज!

बँक ऑफ बडोदाची विशेष मुदत ठेव योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा २ लाखांहून अधिक व्याज!

Bank of Baroda : जर तुम्ही असे गुंतवणूकदार असाल ज्यांना जोखीम पत्करायची नाही आणि ज्यांना खात्रीशीर परतावा हवा आहे, तर मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणे हा तुमच्यासाठी योग्य निर्णय ठरू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 17:10 IST2026-03-17T16:36:40+5:302026-03-17T17:10:07+5:30

Bank of Baroda : जर तुम्ही असे गुंतवणूकदार असाल ज्यांना जोखीम पत्करायची नाही आणि ज्यांना खात्रीशीर परतावा हवा आहे, तर मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणे हा तुमच्यासाठी योग्य निर्णय ठरू शकतो.

Bank of Baroda 5 Year FD Returns: Calculate Interest on 5 Lakh Investment March 2026 | बँक ऑफ बडोदाची विशेष मुदत ठेव योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा २ लाखांहून अधिक व्याज!

बँक ऑफ बडोदाची विशेष मुदत ठेव योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा २ लाखांहून अधिक व्याज!

Bank of Baroda :शेअर बाजारातील अनिश्चिततेच्या काळात सुरक्षित आणि खात्रीशीर परतावा देणारा गुंतवणूक पर्याय म्हणून 'फिक्स्ड डिपॉझिट'कडे पाहिले जाते. सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज बँक ऑफ बडोदा सध्या ५ वर्षांच्या एफडीवर आकर्षक व्याजदर देत आहे. जर तुम्ही ५ लाख रुपयांची गुंतवणूक ५ वर्षांसाठी केली, तर तुम्हाला व्याजापोटी २ लाख रुपयांहून अधिक नफा मिळू शकतो.

व्याजदरांचे सविस्तर गणित
बँकेने वेगवेगळ्या वयोगटातील ग्राहकांसाठी व्याजाचे दर खालीलप्रमाणे निश्चित केले आहेत.

  • सामान्य ग्राहक : ३ वर्षांहून अधिक आणि ५ वर्षांपर्यंतच्या एफडीवर ६.३०% व्याज.
  • ज्येष्ठ नागरिक (६० वर्षांवरील) : या ग्राहकांसाठी ६.९०% व्याज दर लागू आहे.
  • अति ज्येष्ठ नागरिक (८० वर्षांवरील) : या गटातील गुंतवणूकदारांना सर्वाधिक ७.००% व्याज दिले जात आहे.

५ लाखांच्या गुंतवणुकीवर किती परतावा मिळेल?

ग्राहक प्रवर्गगुंतवणुकीची रक्कम५ वर्षांनंतरचे व्याजएकूण मॅच्युरिटी रक्कम
सामान्य नागरिक५,००,०००१,८३,४५०६,८३,४५०
ज्येष्ठ नागरिक५,००,०००२,०३,९२१७,०३,९२१
अति ज्येष्ठ नागरिक५,००,०००२,०७,३८९७,०७,३८९

एफडीमध्ये गुंतवणुकीचे फायदे

  • खात्रीशीर परतावा: बाजारातील चढ-उतारांचा एफडीवर कोणताही परिणाम होत नाही, त्यामुळे तुमचा परतावा निश्चित असतो.
  • सुरक्षित गुंतवणूक: सरकारी बँक असल्याने तुमचे भांडवल पूर्णपणे सुरक्षित राहते.
  • ज्येष्ठ नागरिकांना झुकते माप: वयानुसार वाढीव व्याजदराचा लाभ मिळत असल्याने सेवानिवृत्त व्यक्तींसाठी हा उत्पन्नाचा उत्तम स्रोत आहे.

वाचा - आयटी वगळता सर्वत्र तेजी! टाटा स्टील आणि महिंद्राची दमदार कामगिरी; गुंतवणूकदारांनी कमावले ३ लाख कोटी

एफडीवर मिळणारे व्याज हे करपात्र असू शकते. त्यामुळे कर सवलतीसाठी तुम्ही ५ वर्षांची 'टॅक्स सेव्हर एफडी' देखील निवडू शकता, ज्यामध्ये ८०सी अंतर्गत वजावट मिळते.

Web Title : बैंक ऑफ बड़ौदा एफडी: 5 साल के निवेश पर शानदार रिटर्न!

Web Summary : बैंक ऑफ बड़ौदा 5 साल के एफडी पर आकर्षक ब्याज दर प्रदान करता है, ₹5 लाख के निवेश पर ₹2 लाख से अधिक ब्याज मिलता है। वरिष्ठ नागरिकों को उच्च दरें मिलती हैं। सुरक्षित रिटर्न, सुरक्षित निवेश और कर लाभ उपलब्ध।

Web Title : Bank of Baroda FD: High returns on 5-year investment!

Web Summary : Bank of Baroda offers attractive FD rates, yielding over ₹2 lakh interest on a ₹5 lakh, 5-year investment. Senior citizens get higher rates. Secure returns, safe investment, and tax benefits available.