lokmat Supervote 2024
Lokmat Money >गुंतवणूक > गौतम अदानी यांचा मेगा प्लॅन; 'या' क्षेत्रात 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार...

गौतम अदानी यांचा मेगा प्लॅन; 'या' क्षेत्रात 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार...

Adani Enterprises investment Plan: अदानी एंटरप्रायझेसचा व्यवसाय रीन्यूएबल एनर्जीपासून ते विमानतळ आणि डेटा सेंटरपर्यंतच्या पसरला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 04:37 PM2024-05-12T16:37:29+5:302024-05-12T16:37:51+5:30

Adani Enterprises investment Plan: अदानी एंटरप्रायझेसचा व्यवसाय रीन्यूएबल एनर्जीपासून ते विमानतळ आणि डेटा सेंटरपर्यंतच्या पसरला आहे.

Adani Enterprises investment Plan: Gautam Adani's Mega Plan; 80 thousand crore rupees will be invested in this sector | गौतम अदानी यांचा मेगा प्लॅन; 'या' क्षेत्रात 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार...

गौतम अदानी यांचा मेगा प्लॅन; 'या' क्षेत्रात 80 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार...

Adani Enterprises Plan: दिग्गज भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani), यांच्या अदानी समूहाची प्रमुख कंपनी असलेली अदानी एंटरप्रायझेस (Adani Enterprises) चालू आर्थिक वर्षात (2024-25) 80,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, या गुंतवणुकीसाठी एक मेगा प्लॅनही तयार करण्यात आला आहे.

अदानी एंटरप्रायझेसचा व्यवसाय रीन्यूएबल एनर्जीपासून ते विमानतळ आणि डेटा सेंटरपर्यंतच्या पसरला आहे. अदानी एंटरप्रायझेसच्या फायनान्स आणि अकाउंट्स विभागाचे AVP  सौरभ शाह यांनी सांगितले की, आम्ही 2024-25 मध्ये सुमारे 80,000 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाचा विचार करत आहोत. या खर्चाचा मोठा भाग रीन्यूएबल एनर्जी आणि विमानतळ व्यवस्थापनावर असेल. 

यातील मोठा हिस्सा अदानी न्यू इंडस्ट्रीज लिमिटेड(ANIL) आणि विमानतळ व्यवसायाला जाईल. या क्षेत्रांसाठी सुमारे 50,000 कोटी रुपयांचा भांडवली खर्च येणार आहे. ANIL सौर मॉड्युल तयार करते, जे सूर्यप्रकाशाचे वीज आणि ग्रीन हायड्रोजनमध्ये रूपांतर करतात. ANIL 10 GW सोलर मॉड्यूल्ससह 3 GW पवन टर्बाइन तयार करण्याच्या विचारात आहे.

अदानी एंटरप्रायझेस कुठे गुंतवणूक करणार?
यातील एक तृतीयांश गुंतवणूक रस्त्यांसाठी असेल. गंगा एक्स्प्रेस वेमुळे रस्ते क्षेत्रात 12,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे.
अदानी समूह आपला पीव्हीसी प्रकल्प सुरू करणार आहे, ज्यामध्ये पीव्हीसी व्यवसायात 10,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.
5,000 कोटी रुपये डेटा सेंटरसाठी खर्च केले जातील.
अदानी कोनेक्सला अब्जावधी डॉलर्सचा निधी मिळणार आहे
उर्वरित रक्कम इतर व्यावसायिक क्षेत्रांवर खर्च केली जाईल.

Web Title: Adani Enterprises investment Plan: Gautam Adani's Mega Plan; 80 thousand crore rupees will be invested in this sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.