Lokmat Money >गुंतवणूक > ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार

ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार

Gold Silver Price 7 August: आज सराफा बाजारातही सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पाहा आता १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 15:40 IST2025-08-07T15:39:42+5:302025-08-07T15:40:39+5:30

Gold Silver Price 7 August: आज सराफा बाजारातही सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. पाहा आता १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार आहे.

7 august 2025 Impact of Trump tariff meaning gold and silver prices at record highs more know 14 to 24 carat latest rate | ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार

ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार

Gold Silver Price 7 August: आज सराफा बाजारातही सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १००९०४ रुपयांच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. तो १०१००० च्या अगदी जवळ आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ४५२ रुपयांनी महागला आहे. त्याच वेळी, चांदी १०२० रुपयांनी वाढली. चांदी आता प्रति किलो ११४५०५ रुपये दरानं विकली जात आहे. जीएसटीसह सराफा बाजारात २४ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम १०३९३१ रुपये दरानं विकलं जातंय, तर चांदी ११७९४० रुपये प्रति किलो विकली जात आहे. बुधवारी, जीएसटीशिवाय चांदी ११३४८५ रुपये प्रति किलोवर बंद झाली. तर, सोनं प्रति १० ग्रॅम १००४५२ रुपयांवर बंद झालं.

आज, ७ ऑगस्ट रोजी, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) ऑक्टोबर महिन्यासाठी सोन्याचा वायदा भाव देखील ०.१४ टक्क्यांनी वाढून ₹१,०१,४०० प्रति १० ग्रॅम झाला. त्याच वेळी, सप्टेंबर महिन्यासाठी चांदीचा वायदा भाव ०.५८ टक्क्यांनी वाढून ₹१,१४,३१९ प्रति किलोग्रॅम झाला.

कोट्यधीश बनवणारा शेअर... १ लाखाचे झाले ३.५० कोटी रुपये, एकेकाळी १० रुपयांपेक्षाही कमी होती किंमत

१४ ते २३ कॅरेट सोन्याचा दर काय?

आज २३ कॅरेट सोन्याचा दर ४५० रुपयांनी वाढला आणि तो १००,५०० रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जीएसटीसह त्याची किंमत आता १०३,५१५ रुपये आहे. यामध्ये मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. २२ कॅरेट सोन्याचा दर ४१४ रुपयांनी वाढून ९२,४२८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. जीएसटीसह तो ९५,२०० रुपयांवर पोहोचलाय. आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ३३९ रुपयांनी वाढून ७५६७८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आणि जीएसटीसह तो ७७९४८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. दुसरीकडे, १४ कॅरेट सोन्याचा भाव आता जीएसटीसह ६०७९९ रुपयांवर पोहोचला आहे. त्यात अद्याप मेकिंग चार्ज समाविष्ट नाही.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सोनं आणि चांदीचे स्पॉट रेट जारी केले आहेत. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असण्याची शक्यता आहे. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता हे दर जारी केले जातात.

Web Title: 7 august 2025 Impact of Trump tariff meaning gold and silver prices at record highs more know 14 to 24 carat latest rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.