Lokmat Money > बिझनेस न्यूज > अकराव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; गुंतवणूकदारांची झोळी भरणार का ही मल्टीबॅगर कंपनी?

अकराव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; गुंतवणूकदारांची झोळी भरणार का ही मल्टीबॅगर कंपनी?

Samvardhan Motherson Stock Price: गेल्या ४ पैकी ३ ट्रेडिंग सत्रांमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. कंपनी गुरुवारी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. तिमाही निकालांसोबतच कंपनी तिच्या शेअरहोल्डर्सना मोठी भेट देण्याची तयारी करत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:33 IST2025-05-29T15:33:56+5:302025-05-29T15:33:56+5:30

Samvardhan Motherson Stock Price: गेल्या ४ पैकी ३ ट्रेडिंग सत्रांमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. कंपनी गुरुवारी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. तिमाही निकालांसोबतच कंपनी तिच्या शेअरहोल्डर्सना मोठी भेट देण्याची तयारी करत आहे.

Samvardhan Motherson stock price up will issue bonus shares for the eleventh time Will this multibagger company huge profit | अकराव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; गुंतवणूकदारांची झोळी भरणार का ही मल्टीबॅगर कंपनी?

अकराव्यांदा बोनस शेअर देणार 'ही' कंपनी; गुंतवणूकदारांची झोळी भरणार का ही मल्टीबॅगर कंपनी?

Samvardhan Motherson Stock Price: मल्टीबॅगर ऑटो कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनलचे शेअर्स गुरुवारी १५२.१० रुपयांवर व्यापार करत होते. गेल्या ४ पैकी ३ ट्रेडिंग सत्रांमध्ये कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. कंपनी गुरुवारी चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे. तिमाही निकालांसोबतच कंपनी तिच्या शेअरहोल्डर्सना मोठी भेट देण्याची तयारी करत आहे. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल बोनस शेअर्स देण्याचा विचार करेल. कंपनीने यापूर्वी २०२२ मध्ये शेवटच्या वेळी तिच्या गुंतवणूकदारांना बोनस शेअर्स जारी केले होते.

मल्टीबॅगर कंपनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनलच्या संचालक मंडळानं आज बोनस शेअर्स जारी करण्यास मान्यता दिल्यास कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना अकराव्यांदा बोनस शेअर्स भेट देणार आहे. संवर्धन मदरसन इंटरनॅशनलनं यापूर्वी १९९७, २०००, २००५, २००७, २०१२, २०१३, २०१५, २०१७, २०१८ आणि २०२२ मध्ये भागधारकांना बोनस शेअर्सचं वाटप केलंय. कंपनीनं प्रत्येक वेळी २:१ या प्रमाणात बोनस शेअर्स दिलेत. म्हणजेच कंपनीनं प्रत्येक २ शेअरमागे १ बोनस शेअर दिलाय. कंपनीनं यावर्षीच्या बोनस शेअरची रेकॉर्ड डेट अद्याप जाहीर केलेली नाही.

उच्चांकी स्तरावरुन ६०० अंकांनी का घसरला सेन्सेक्स, काय आहेत या घसरणीची कारणं?

महसूल वाढला

मल्टीबॅगर कंपनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनलचा महसूल डिसेंबर २०२४ तिमाहीत ८ टक्क्यांनी वाढून २७,६६६ कोटी रुपये झालाय. तर डिसेंबर २०२४ तिमाहीत कंपनीचा नफा मागील वर्षाच्या तुलनेत ६२ टक्क्यांनी वाढून ८७९ कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या एबिटडामध्ये वार्षिक आधारावर १३ टक्के वाढ झाली, तर मार्जिनमध्ये ५० बेसिस पॉईंट (अर्धा टक्के) वाढ झाली. गेल्या दोन वर्षांत संवर्धन मदरसन इंटरनॅशनलचा शेअर ८५ टक्क्यांनी वधारलाय. तर कंपनीच्या शेअर्समध्ये पाच वर्षांत १३३ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. गेल्या महिन्याभरात संवर्धन मदरसनच्या शेअरमध्ये १० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Samvardhan Motherson stock price up will issue bonus shares for the eleventh time Will this multibagger company huge profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.