देशांतर्गत शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरण दिसून येत आहे. मात्र या घसरणीच्या परिस्थितीतही, एसएम गोल्ड पेनी स्टॉक रॉकेट बनला आहे. हा शेअर बुधवारी बीएसईवर १६% हूनही अधिक वधारला आणि ₹२०.१५ वर बंद झाला. सध्या हा शेअर त्याच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकाच्या अगदी जवळ आहेत.
एसएम गोल्डच्या शेअर्सचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ₹२१.८० एवढा आहे. गेल्या पाच दिवसांत या शेअरमध्ये ६१% वाढ झाली. त्याने बुधवारी २०.७० च्या आकड्यालाही स्पर्ष केला.
एसएम गोल्डच्या शेअरने पाच दिवसांत दिला ६१% परतावा -
ज्वैलरी बिजनेसशी संबंधित एसएम गोल्ड कंपनीच्या शेअर्समध्ये गेल्या पाच दिवसांत ६१.७२% वाढ झाली आहे. ८ जानेवारी २०२६ रोजी कंपनीचा शेअर ₹१२.४६ वर होता. तो १४ जानेवारी २०२६ रोजी ₹२०.१५ वर बंद झाले. या वर्षी आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सची किंमत ६१.८५% एवढी वाढली आहे.
बुधवारी एस.एम. गोल्डच्या मार्केट कॅपने ₹२६ कोटींचा टप्पा ओलांडला. महत्वाचे म्हणजे, कंपनीत प्रमोटर्सचा वाटा ३३.९१% एवढा आहे. तर सार्वजनिक शेअरहोल्डिंग ६६.०९% एवढी आहे.
५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून ८५% वधारला शेअर -
एस.एम. गोल्डचा शेअर त्यांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून ८५% वधारला आहे. २२ डिसेंबर २०२५ रोजी एस.एम. गोल्डचा शेअर ₹१०.९० वर होते. तो १४ जानेवारी २०२६ रोजी ₹२०.१५ वर पोहोचला.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
