Reliance Jio Plan: मुकेश अंबानी यांची रिलायन्स जिओ ही भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशातील बहुतांश मोबाइल युजर्स जिओशी जोडलेले आहेत. जिओ आपल्या युजर्सला अतिशय स्वस्त रिचार्ज प्लान ऑफर करते. यासोबतच यात अनेक ऑफर्सही दिल्या जातात, ज्या जिओ युजर्सना खूप आवडतात. जर तुम्हीही जिओ युजर असाल तर आज आम्ही तुम्हाला जिओच्या एका परवडणाऱ्या रिचार्ज प्लॅनबद्दल सांगणार आहोत जो प्रत्येक युजरला आवडेल. चला जाणून घेऊया.
जिओचा बेस्ट रिचार्ज प्लान
जिओचा १०४९ रुपयांचा रिचार्ज प्लान हा जिओच्या बेस्ट प्लान्सपैकी एक आहे. या प्लानमध्ये युजर्संना लॉन्ग व्हॅलिडिटी सोबतच अनलिमिटेड बेनिफिट्सचाही फायदा मिळतो. जिओच्या या प्लानची खास गोष्ट म्हणजे या प्लानमध्ये युजर्संना सोनीलिव्ह, झी ५ आणि जिओ हॉटस्टारचं फ्री सब्सक्रिप्शन मिळते. जाणून घेऊया जिओच्या १०४९ रुपयांच्या प्लानमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल.
जिओचा १०४९ रुपयांचा प्लान
जिओचा १०४९ रुपयांचा प्लान संपूर्ण ८४ दिवसांच्या वैधतेसह येतो. ८४ दिवसांची वैधता असलेल्या या प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा आणि दररोज १०० फ्री एसएमएसचा लाभ मिळतो. याशिवाय या प्लानमध्ये तुम्हाला सोनीलिव्ह, झी ५ आणि जिओ हॉटस्टारचं फ्री सब्सक्रिप्शन मिळतं. इतकंच नाही तर या प्लानमध्ये युजर्संना ५० जीबी जिओ एआय क्लाउडचा अॅक्सेसदेखील मिळतो.