Reliance Jio Plans hikes: रिलायन्स जिओच्या प्लॅन्समध्ये 480 रुपयांपर्यंत वाढ; जाणून घ्या कधीपासून होणार लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 08:20 PM2021-11-28T20:20:42+5:302021-11-28T20:21:10+5:30

Reliance Jio Tariffs increased: रिलायन्स जिओने आपले प्लॅन्स अन्य मोबाईल कंपन्यांपेक्षा स्वस्त असल्याचा दावा केला आहे. एअरटेल, व्होडाफोनने देखील त्यांच्या प्लॅनमध्ये मोठी वाढ केली आहे.

Reliance Jio Plans hikes prepaid tariffs by 20% effective December 1; most hike is 480 rupees | Reliance Jio Plans hikes: रिलायन्स जिओच्या प्लॅन्समध्ये 480 रुपयांपर्यंत वाढ; जाणून घ्या कधीपासून होणार लागू

Reliance Jio Plans hikes: रिलायन्स जिओच्या प्लॅन्समध्ये 480 रुपयांपर्यंत वाढ; जाणून घ्या कधीपासून होणार लागू

Next

मुकेश अंबानींच्या रिलायन्स जिओने (Reliance Jio) एअरटेल(Airtel) , व्होडाफोनप्रमाणे (Vodafone Idea) प्रीपेड प्लान्समध्ये मोठी वाढ केली आहे. या आधी या दोन्ही कंपन्यांनी प्लॅन्समध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. यामुळे आता जिओ ग्राहकांनाही मोठा झटका बसला आहे. जिओने थोडथोडकी नव्हे तर तब्बल 480 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. 

रिलायन्स जिओने जारी केलेल्या माहितीनुसार नवीन टेरिफ प्लॅन 1 डिसेंबर 2021 पासून लागू होणार आहेत. तरीही आपले प्लॅन्स अन्य मोबाईल कंपन्यांपेक्षा स्वस्त असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यामुळे १ डिसेंबरपासून वाढलेल्या दरात ग्राहकांना रिचार्ज करावे लागणार आहे. 

जियोने प्लान्सच्या किंमतीत 16 रुपयांपासून 480 रुपयांपर्यंत वाढ केली आहे. जिओफोनसाठी असलेल्या विशेष प्लॅन 75 रुपयांऐवजी आता 91 रुपये मोजावे लागणार आहेत. अनलिमिटेड प्लान्स 129 रुपयांचा आता 155 रुपये होणार आहे. डाटा अॅड ऑन्स प्लॅनचे रेट देखील वाढविण्यात आले आहेत. 6 जीबीच्या प्लॅनसाठी 51 रुपयांऐवजी आता 61 रुपये मोजावे लागणार आहेत. तर 101 रुपयांच्या 12 जीबी प्लॅनसाठी 121 रुपये मोजावे लागणार आहेत. 50 जीबीचा प्लॅनदेखील 50 रुपयांनी महागला आहे. 

सर्वाधिक कोणता प्लॅन महागला
जिओच्या प्लॅन्समध्ये सर्वाधिक वाढ ही 365 दिवसांच्या प्लॅनची झाली आहे. जो प्लॅन 2399 रुपयांना मिळत होता तो आता 2879 रुपयांना मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना वर्षासाठी 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड व्हाईस कॉल व 100 एसएमएस दररोज मिळतात. 

Web Title: Reliance Jio Plans hikes prepaid tariffs by 20% effective December 1; most hike is 480 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app