The RBI has lifted restrictions on the Youth Development Co-Operative Bank in Maharashtra, giving account holders other benefits, including withdrawals | दिलासादायक! आरबीआयने महाराष्ट्रातील या बँकेवरील निर्बंध हटवले, खातेदारांना पैसे काढण्यासह मिळतील अन्य सुविधा

दिलासादायक! आरबीआयने महाराष्ट्रातील या बँकेवरील निर्बंध हटवले, खातेदारांना पैसे काढण्यासह मिळतील अन्य सुविधा

मुंबई - गेल्या काही काळात भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI ) महाराष्ट्रातील काही सहकारी बँकांवर निर्बंध लादल्याने हजारो खातेदारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँकेने आता राज्यातील एका बँकेवरील निर्बंध हटवले आहेत. कोल्हापूरमधील यूथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवरील (Youth Development Co-Operative Bank  in Maharashtra) निर्बंध हटवत रिझर्व्ह बँकेने लाखो खातेदारांना दिलासा दिला आहे. (The RBI has lifted restrictions on the Youth Development Co-Operative Bank  in Maharashtra, giving account holders other benefits, including withdrawals)

कोल्हापूरमधील या सहकारी बँकेची वाईट आर्थिक स्थिती पाहून रिझर्व्ह बँकेने या बँकेमधून पैसे काढण्यावर पाच हजार रुपयांची मर्यादा घालण्यासह अनेक निर्बंध लादले होते. सुरुवातीला ५ जानेवारी २०१९ रोजी सहा महिन्यांसाठी निर्बंध लादले होते. त्यानंतर या निर्बंधांचा कालावधी वेळोवेळी वाढवण्यात आला होता.  

दरम्यान, आरबीआयने एक परिपत्रक प्रसिद्ध करत सांगितले की, भारतीय रिझर्व्ह बँकेने या बँकेची आर्थिक स्थिती समाधानकारक असल्याचे पाहिल्यानंतर खातेदारांच्या हिताच्या दृष्टीने ५ एप्रिल २०२१ पासून कोल्हापूरमधील यूथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवरील सर्व निर्बंध मागे घेतले आहेत. 

यूथ डेव्हलपमेंट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवरील निर्बंध हटवल्याने या बँकेच्या व्यवहारावर जे निर्बंध लादले गेले होते ते दूर झाले आहेत. त्यामुळे आता आरबीआयच्या मान्यतेशिवाय कुठल्याही कर्जाला मंजुरी तसेच नुतनीकरण, तसेच कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यास परवानगी मिळणार आहे.  

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: The RBI has lifted restrictions on the Youth Development Co-Operative Bank in Maharashtra, giving account holders other benefits, including withdrawals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.