RBI approves to Piramal group to Buying DHFL company | अंबानींचे व्याही खरेदी करतायत 84000 कोटींच्या कर्जात बुडालेली 'ही' बडी कंपनी, RBIनं दिली मंजुरी

अंबानींचे व्याही खरेदी करतायत 84000 कोटींच्या कर्जात बुडालेली 'ही' बडी कंपनी, RBIनं दिली मंजुरी

नवी दिल्ली - रिझर्व बँक ऑफ इंडियाने पिरामल ग्रुपला (Piramal group) 37,250 कोटी रुपयांत DHFL (Dewan Housing Finance Corporation)च्या अधिग्रहणासाठी मंजुरी दिली आहे. या डीलला DHFL च्या कर्जदात्यांच्या समितीकडूनही (COC) आधीच मंजुरी मिळाली आहे. सीओसीने पिरामल ग्रुपची कंपनी पिरामल कॅपिटल अँड हाउसिंग फायनान्स लिमिटेडच्या समाधान योजनेला गेल्या महिन्यातच मंजुरी दिली होती. (RBI approves to Piramal group to Buying DHFL company)

पिरामल ग्रुपचे प्रमुख अजय पिरामल (Ajay Piramal) हे देशातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे व्याही आहेत. फायनांशिअल सर्व्हिसेस आणि फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये पिरामल ग्रुपचा व्यवसाय आहे. याशिवाय रिअल इस्टेटमध्येही ते आहेत. त्यांचा मुलगा आनंद पिरामल यांचा विवाह मुकेश अंबानी यांची एकुलती एक कन्या ईशा अंबानी सोबत झाला आहे. पिरामल ग्रुपने एका निवेदनात म्हटले आहे, ‘आरबीआयने पिरामल कॅपिटल अँड हाउसिंग फायनान्सच्या DHFL समाधान योजनेला मंजुरी दिली आहे.’ गेल्या आठवड्यातच DHFLने डिसेंबर 2020 मध्ये संपलेल्या तिमाहीदरम्यान 13,095.38 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ तोटा (Consolidated net loss) झाल्याचे म्हटले होते.

मुकेश अंबानी Reliance Jioच्याच 4G मायाजालात गुरफटले; 5G वर सरकारचे मोठे वक्तव्य

कंपनीवर  83,873 कोटी रुपयांचे कर्ज होते -
DHFL वर जुलै 2019 मध्ये बँकांचे तब्बल 83,873 कोटी  रुपयांचे कर्ज होते. यात सर्वाधिक 10,083 कोटी रुपयांचे कर्ज भारतीय स्टेट बँकेचे आहे. मार्च 2020 मध्ये कंपनीची मालमत्ता (Assets) 79,800 कोटी रुपये एवढी होती. यांपैकी 63 टक्के एनपीए झाली होती.

या शर्यतीत Oaktree चाही होता समावेश -
अमेरिकन अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी Oaktree नेही या शर्यतीत भाग घेतला होता. यात Oaktree ला 45 टक्के मते मिळाली. याच वेळी या शर्यतीत सहभागी असलेल्या अदानी कॅपिटल या दुसर्‍या कंपनीला केवळ 18 टक्के मते मिळाली. Oaktree यांनी डीएचएफएलसाठी 38,400 कोटी रुपयांची बोली लावली होती, तर पिरामलने 37,250 कोटींची बोली लावली होती. मात्र, पिरामलच्या ऑफरमध्ये अग्रीम रोख रकमेचा वाटा अधिक होता आणि म्हणून या गटाने हा लिलाव जिंकला.

मुकेश अंबानींच्या Reliance Jio ची बादशाही धोक्यात; जगज्जेत्या अब्जाधीशाची कंपनी येतेय

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: RBI approves to Piramal group to Buying DHFL company

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.