Lokmat Money > बिझनेस न्यूज > रेल्वेच्या खासगीकरणासंबंधी मोठा निर्णय! Railtelमधील भागीदारी विकण्याचा मोदी सरकारचा विचार

रेल्वेच्या खासगीकरणासंबंधी मोठा निर्णय! Railtelमधील भागीदारी विकण्याचा मोदी सरकारचा विचार

DIPAMने CONCOR वर काम सुरू केले आहे. CONCORवरही GoM स्थापना करण्यात आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 07:38 PM2020-08-03T19:38:26+5:302020-08-03T20:47:31+5:30

DIPAMने CONCOR वर काम सुरू केले आहे. CONCORवरही GoM स्थापना करण्यात आली आहे.

railway privatization process of concor continues considering selling stake in railtel board decision | रेल्वेच्या खासगीकरणासंबंधी मोठा निर्णय! Railtelमधील भागीदारी विकण्याचा मोदी सरकारचा विचार

रेल्वेच्या खासगीकरणासंबंधी मोठा निर्णय! Railtelमधील भागीदारी विकण्याचा मोदी सरकारचा विचार

नवी दिल्लीः गेल्या 2 वर्षांत सुमारे 4 कंपन्यांची यादी तयार केल्यानंतर मोदी सरकारची रेल्वेच्या पुढील निर्गुंतवणुकीसाठी (Railway Privatization) मोठी योजना आहे. रेल्वे बोर्डा(Railway Board)चे अध्यक्ष विनोदकुमार यादव यांनी सीएनबीसी-आवाजच्या लक्ष्मण रॉय यांच्यासमवेत खास चर्चा केली, त्यात ते म्हणतात, CONCORच्या खासगीकरणाची प्रक्रिया सुरू आहे आणि पुढे Railtelमध्येही निर्गुंतवणुकीची प्रक्रिया होऊ शकते. DIPAMने CONCOR वर काम सुरू केले आहे. CONCORवरही GoM स्थापना करण्यात आली आहे. निर्गुंतवणुकीबाबत काही दिवसांत निर्णय अपेक्षित आहे.

मागणीनुसार रेल्वे चालविण्याचे उद्दिष्ट 
विनोदकुमार यादव पुढे म्हणाले की, रेल्वे सध्या पायाभूत सुविधा सुधारण्यावर अधिकाधिक भर देत आहे. मागणीनुसार रेल्वे चालविण्याचे उद्दिष्ट आहे. जास्त मागणी असलेल्या मार्गांवर मल्टी ट्रॅकिंग करणार आहेत. सिग्नल यंत्रणेचे आधुनिकीकरण केले जात आहे. 2-3 वर्षांत आम्ही प्रतीक्षा यादीची आवश्यकता दूर करणार आहोत. पुढील 2-3 वर्षांत आम्ही मागणीनुसार गाड्या चालवल्या जाणार असून, वेटिंग लिस्टची गरज संपणार आहे. Concorच्या निर्गुंतवणुकीचे काम लवकरच पूर्ण होईल. 

Web Title: railway privatization process of concor continues considering selling stake in railtel board decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.