Insurance Companies: विमा बाजारातील एजंटांना मिळणाऱ्या भरमसाठ कमिशनला आता कात्री लागण्याची शक्यता आहे. ग्राहकांना 'मिस-सेलिंग' आणि महागड्या प्रीमियमपासून वाचवण्यासाठी नवीन नियम बनवण्याची तयारी सुरू आहे. विमा नियामक IRDAI नं इशारा दिलाय की, वितरण (पॉलिसी विक्री) खर्च वाढल्यामुळे विम्याचा प्रीमियम महाग होत आहे. कंपन्यांकडून एजंट्सना जास्त पैसे देण्याच्या नादात सर्वसामान्यांना महागडी पॉलिसी खरेदी करावी लागत आहे.
RBI नं देखील आपल्या अहवालात या वाढत्या खर्चावर चिंता व्यक्त केली आहे. उद्योगातील तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जेव्हा पहिल्या वर्षी एजंट्सना खूप जास्त कमिशन मिळतं, तेव्हा मिस-सेलिंगची (चुकीची माहिती देऊन पॉलिसी विकणं) प्रकरणंही वाढतात. जास्त पैशांच्या लोभापायी एजंट ग्राहकांना चुकीच्या पद्धतीनं पॉलिसी विकतात. याचा फटका पॉलिसीधारकांना बसतो.
Post Office ची जबरदस्त स्कीम, व्हाल मालामाल; वाचवा केवळ ४०० रुपये; मिळेल २० लाख रुपयांचा निधी
६०,८०० कोटींचे कमिशन
आकडेवारीनुसार, २०२४-२५ मध्ये लाईफ इन्शुरन्स कंपन्यांनी कमिशन म्हणून ६०,८०० कोटी रुपये वाटले, जे मागील वर्षापेक्षा १८% जास्त आहे. याच काळात कंपन्यांच्या प्रीमियममध्ये (कमाई) केवळ ६.७३% वाढ झाली आहे.
