pratap bose resigns as tata motors global design chief after 14 years | Tata Motors च्या प्रताप बोस यांचा राजीनामा; १४ वर्षे केल्या टाटाच्या गाड्या डिझाइन

Tata Motors च्या प्रताप बोस यांचा राजीनामा; १४ वर्षे केल्या टाटाच्या गाड्या डिझाइन

नवी दिल्ली: अलीकडील काळात टाटा मोटर्सने भारतीय ग्राहकांची मने जिंकली असून, टाटाच्यावाहन विक्रीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. टाटाचा इलेक्ट्रिक वाहन उद्योगातील दबदबाही वाढताना दिसत आहे. मात्र, यातच आता टाटा मोटर्सचे ग्लोबल डिझाइन हेड प्रताप बोस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. बोस यांच्या जागी  मार्टिन उहलारिक टाटा मोटर्सच्या ग्लोबल डिझाइनचे नवे प्रमुख असतील, अशी माहिती मिळाली आहे. (pratap bose resigns as tata motors global design chief)

उत्तम संधीचे कारण देत त्यांनी टाटा मोटर्स सोडण्याचा निर्णय घेतला आहे. टाटा कंपनीच्या कार्सला अधिक आकर्षक आणि फँन्सी लूक देण्यामागे प्रताप बोस यांचा मोठा वाटा होता, असे सांगितले जात आहे. प्रताप बोस टाटा मोटर्सच्या ग्लोबल डिझाइनचे प्रमुख झाल्यापासून टाटा वाहनांच्या लूकमध्ये मोठा बदल झाल्याचे पाहायला मिळाले होते. टाटाची वाहने त्यांच्या परफॉर्मेंससाठी ओळखले जातात. मात्र, आता डिझाइन आणि लूकची चर्चाही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे म्हटले जाते. 

कौतुस्कास्पद! कॅफेटेरिया बनलं कोरोना केअर सेंटर; Tech Mahindra चा पुढाकार

सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली माहिती

Tiago, Harrier, Nexon आणि Altroz सारख्या कार्स भारतीय ग्राहकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरल्या आहेत. प्रताप बोस यांनी सोशल मीडियाद्वारे टाटा मोटर्ससोबतच प्रवास थांबवत असल्याची माहिती दिली. टाटा मोटर्ससोबतचा १४ वर्षांचा प्रवास खूपच चांगला होता. मात्र, आता कंफर्ट झोन सोडून प्रोफेशनल डिझाइनच्या क्षेत्रात नवीन आव्हानांचा सामना करण्याची वेळ आली आहे. टाटा मोटर्स लिमिटेडमध्ये माझी पहिली असाइनमेंट Safari Storme होती आणि हे पाहणे खूपच आनंदी आहे की आता पूर्ण प्रवास नवीन सफारीच्या लाँचसोबत पूर्ण झाला आहे, अशी प्रतिक्रिया बोस यांनी दिली आहे. 

मस्तच! आता लसीकरण केंद्राची माहिती WhatsApp वर मिळणार; सेव्ह करा ‘हा’ नंबर

रतन टाटा, सायरस मिस्त्री आणि एन चंद्रशेखरन सारख्या तीन चेअरमनसोबत काम करण्याची संधी मिळाली, हे भाग्य असून, Tata Bolt, Zest, Tiago, Tigor, Nexon, HXA, Altroz, Harrier, Safari, HBX, Prima, Signa, Ultra, Intra यांसारख्या गाड्यांसोबतच कॉन्सेप्ट कार्स जसे की, Pixel, Megapixel, Nexon, Racemo, H5X, 45X, H2X, Sierra यादेखील माझ्यासाठी खास आहेत, असे बोस यांनी नमूद केले आहे.  
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: pratap bose resigns as tata motors global design chief after 14 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.